परळी खोऱ्यात रानटी डूकराकडून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान.

परळी खोऱ्यात रानटी डूकराकडून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे  नुकसान.

-----------------------------------------------

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

अमर इंदलकर 

-----------------------------------------

 सातारा जिल्ह्यातील परळी खोऱ्यात बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी झाली असून पाऊस देखील योग्य प्रमाणात पडत असल्याने शेतकरी आनंदीत आहेत परंतु शेतात जे पीक घेतले गेले आहे त्या पिकाचे वन्य प्राण्या कडून नुकसान होत असल्याचे पाहावयास मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परळी खोऱ्यातील शेतकऱ्याचे रानटी डुक्कर, भेकर, ससे,ह्या प्राण्याकडून नुकसान सातत्याने होत आहे.तसेच सोयाबीन- भुईमूग पिकाचे नुकसान मोर लांडोर करतातच त्यामुळे शेतकऱ्याचे सातत्याने नुकसान होत असते, ह्याविषयास अनुसरून खूपवेळा माध्यमानी ह्या पूर्वी देखील बातम्या देखील प्रसिद्ध केल्या आहेत. ह्या विषयास अनुसरून परळी खोऱ्यात मोर्चे देखील ह्या पूर्वी काढले गेले आहेत. वन्य प्राण्याकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा संताप वाढत असून त्यावर ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. तसेच ह्या भागात बिभट्या देखील पुष्कळदा पाहावयास मिळत असून, तार कंपाउंड, कुंपण, अशा उपाययोजना वन खात्याकडून करण्यात याव्यात अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.