तृतीयपंथी पांडुरंग गुरव यांची आदमापूर प्राथमिक शाळेस एक लाख रुपये देणगी स्वरुपात मदत सामाजिक बांधिलकी आणि दातृत्वाचे परीसरातून कौतुक.
तृतीयपंथी पांडुरंग गुरव यांची आदमापूर प्राथमिक शाळेस एक लाख रुपये देणगी स्वरुपात मदत सामाजिक बांधिलकी आणि दातृत्वाचे परीसरातून कौतुक.
---------------------------------
विजय कांबळे
बिद्री प्रतिनिधी
---------------------------------
गावोगावी जोगवा मागुन आपला उदरनिर्वाह करणारे तृतीयपंथी पांडुरंग गुरव (देवमामा) यांनी आदमापूर ता. भुदरगड जि. कोल्हापूर या जिल्हा परिषद शाळेस रोख एक लाख रुपये देणगी स्वरुपात मदत केली आहे. त्यांचा या दातृत्वा बद्दल परिसरातून कौतुक केले जात आहे. पांडुरंग गुरव यांचे मूळगाव आसगोळी ता. चंदगड हे असुन ते देवदर्शनासाठी आदमापूर येथे आले होते. शाळेची अपूर्ण ईमारत पाहुन शाळेला एक लाख रुपये देणगी दिली.एकीकडे ज्यांनी ज्या शाळेत शिक्षण घेत सरकारी नोकरी करुन मोठे झाले पण शाळेला मदत करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध करणारे आदमापूरतील संत बाळूमामा मंदिर आणि त्याचा वाढत जाणारा विस्तार लक्षात घेता कोट्यवधीची उलाढाल होत असते पण अशा गावात प्राथमिक शाळेचे बांधकाम अपूर्ण राहतेच कसे हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.अनेक मंत्री आमदार खासदार या गावाला भेट देत असतात पण कोणच्याही लक्षात ही बाब येऊ नये हेच नवल वाटत.या सर्वांना आपल्या कार्यातून चपराक देण्याचे काम पांडुरंग गुरव यांनी केले आहे. आपल्या वृध्दापकाळाची तमा न करता आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्यांनी ही मदत केली आहे. त्यांच्या या कार्याला मनापासून सलाम.......
Comments
Post a Comment