महिलां जस्या कुटुंबाचे संगोपन करतात तसेच महिलांनी वृक्ष संगोपनाचा पुढाकार घ्यावा ; ग्रा.प सदस्य सौ.आम्रपाली सुरेश आघम.
महिलां जस्या कुटुंबाचे संगोपन करतात तसेच महिलांनी वृक्ष संगोपनाचा पुढाकार घ्यावा ; ग्रा.प सदस्य सौ.आम्रपाली सुरेश आघम.
-----------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
-----------------------------------
"वन आणि मन जपले पाहिजेत ते आरोग्यरक्षक आहेत"
वाशिम ; महिलां जस्या कुटुंबाचे संगोपन करतात तसेच महिलांनी वृक्ष संगोपनाचा पुढाकार घ्यावा असे आव्हान वाशिम तालुक्यातील कोंडाळा माहल्ली ग्रामपंचात सदस्य तथा प्रोफेशनल सोशल वर्कर सौ.आम्रपाली सुरेश आघम यांनी केले आहे. आज जगात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असून त्यामुळे पाऊस अनियमित झाला आहे. प्रकृतीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. परंतु केवळ झाडे लावून संवर्धन होत नाही. `झाडे लावा झाडे जगवा’ हा मूलमंत्र जपला पाहिजे निसर्गाच्या विरूद्ध कुणीही जाऊ नये. प्रत्येकाने निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. फक्त झाडे लावून उपयोग नाही त्यांची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. झाडे आहेत म्हणून आपण आहोत याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे.आपल्या देशात जमीनही आहे आणि लोकांकडे पुरेसा वेळही. आपण जर ठरविले तर भविष्यात जगाला प्राणवायू पुरवणारा देश म्हणून आपण भारताचे स्थान निर्माण करू शकतो. निसर्गचक्र व्यवस्थित सुरू ठेवायचे असेल तर झाडे लावणे व जगविणे आवश्यक आहे. झाडे लावण्याबरोबर झाडे जगवली तरच आपण पर्यावरणरक्षण रक्षण करू शकतो. म्हणून महिलांनी देखील वृक्षारोपणासाठी मोठ्या संख्येने पुढाकार घेतला पाहिजे महिला जशा देश चालवू शकतात आणि आपल्या कुटुंबाचे संगोपन करू शकता तसेच वृक्षाचेही संगोपन करण्याकरिता महिलांनी पुढाकार घ्यावा. असे आव्हानात्मक प्रतिपादन राजा प्रसेनजीत अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था केकतउमरा प्रतिनिधी व ग्रामपंचायत सदस्य कोंडाळा महाली सौ.आम्रपाली सुरेश आगम यांनी केले आहे
*वृक्षाचे कार्य*-
प्राणवायू (ऑक्सिजन) उत्पादन हवेचे प्रदूषण थांबवणे भूमीची फलद्रूपता टिकवणे आणि भूमीची धूप थांबवणे भूगर्भ पाण्याची पातळी उंचावणे आणि हवेत आर्द्रता टिकवणे पशूपक्षी यांचे आश्रयस्थान, प्रथिनांत (प्रोटीनमध्ये) रूपांतर करणे.
एक वृक्ष तोडल्याने १७ लाख रुपयांचा तोटा होतो. महापालिका मात्र वृक्ष तोडणार्यास १०० ते १००० रुपये दंड आकारते. वृक्षारोपण केलेली ७०-८० टक्के झाडे मरतात. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षरोपण हे नऊ पिढीच्या आयुष्यासाठी महत्त्वाचे आहे वृक्षारोपण हे प्रभावीपणे मोठ्या संख्येने करणे गरजेचे
*प्रदिप पट्टेबहादूर ; पर्यावरण प्रेमी सर्पमित्र सकाळ जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त ( महाराष्ट्र शासन )*
Comments
Post a Comment