राजुरा विधानसभा क्षेत्रातील गडचांदूर, पुगडी पठार, नोकारी, जामणी, गोवारीगुडा सहकाऱ्यांसह दौरा.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील गडचांदूर, पुगडी पठार, नोकारी, जामणी, गोवारीगुडा सहकाऱ्यांसह दौरा.
-------------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधि
मंगेश तिखट
------------------------------------
गडचांदूर येथील सुप्रसिद्ध प्रेमाचा चहाचा आस्वाद घेताना शहरातील युवा तरुणांशी शहराच्या समस्या विषयी आढावा घेतला. गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन पूजा करून माल्याअर्पण करण्यात आला. त्यावेळी प्रभागातील नागरिकांनी मला समस्या सांगितल्या व प्रभागात नागरिकांसह फिरत असताना गडचांदूर नगर परिषदेचे नियोजन शून्य काम आढळले.समस्यांचे निवारण करेल अशी खात्री दिली.
साईनगर येथील साईं बाबांचं अभिषेक करण्याचा योग मला मिळाला, साईंच्या चरणी नतमस्तक होऊन या मतदार संघातील जनतेला सुखी समृद्ध ठेवा हीच मनोभावी प्रार्थना केली.
दौऱ्याची सुरुवात करताना कोरपणा तालुक्यातील गडचांदूर, पुगडी पठार, जामणी, नोकरी, गोवारीगुडा येथे जाऊन ग्रामस्थांच्या दैनंदिन जिवनाच्या अत्यंत गरजू समस्येविषयी आढावा घेतला. शेतमजूर, कामगार, युवा सुशिक्षित बेरोजगारी, व्यवस्थित शिक्षणाची उपलब्धता नाही, स्वच्छ पाणी नाही, रस्ते, नाली, रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य, दत्तक घेतलेल्या गावात चिखलाने रस्ते रंगून दिसताना आढळले. शासनाच्या योजनेचा लाभ न मिळणाऱ्या गावाची दयनीय अवस्था बघताना मिळाली.
जिल्हाधिकारी, खासदार, आमदार, तहसीलदार हे सर्व शासनाच्या जबाबदार पदावर असताना. शासनाच्या योजना, सोयी सुविधा, नागरिक मूलभूत गरजांपासून वंचित आहे. वास्तविक पाहता याचे कारणीभूत हे जबाबदार पदावर असलेले लोकप्रतिनिधी आहेत.
सायंकाळी गडचांदूर येथील दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गुरु दत्तांच्या चरणी नतमस्तक होऊन जनतेच्या मनात एक नवी परिवर्तनाची लाट येऊ दे हीच गुरु दत्तांना मनोभावी प्रार्थना केली व महाप्रसाद ग्रहण केला. मंदिराच्या मंडळ सदस्यांनी माझं व माझ्या सहकाऱ्यांचं स्वागत केलं. गणेशभाऊ सातपाडे, निखिलभाऊ ठेंगणे, विकीभाऊ गोरे, आशुतोष भाऊ नागोसे, पंकजभाऊ इटनकर, व इतर मुख्य सदस्यांनी स्वागत केल्याबद्दल मी त्यांचं मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
यावेळी उपस्थित माझे मोठे बंधू नितीन भोयर, कोरपणा तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ कांबळे, सचिन पाल सर, आशिषजी कोल्हे, शहर उपाध्यक्ष राजभाऊ गरगेलवार, मनसे सैनिक मयूरभाऊ जोगी, मंगेश चौधरी, प्रसिद्धी प्रमुख अक्षय भांदक्कर हे देखील उपस्थित होते.
Comments
Post a Comment