Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विद्युत लाईनला पावसाच्या पाण्याच्या थेंबाची ॲलर्जी.

 विद्युत लाईनला पावसाच्या पाण्याच्या थेंबाची ॲलर्जी.

--------------------------------------

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत सिंह ठाकुर 

--------------------------------------

पावसाळा सुरू होऊन जेमतेम तिसरा आठवडा झाला तेव्हापासून मान्सूनपूर्व कामे वेळेत न केल्यामुळे येथे पावसाचा थेंब अथवा आकाशात ढग जरी जमा झाले तरी स्थानिक व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित केला जातो जणूकाही त्याला पावसाच्या पाण्याची ॲलर्जी आहे.

गेल्या पंधरा -वीस दिवसांपासून येथे विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. वीज गेल्यानंतर ती केव्हा येईल ? याची खात्री नसल्याने स्थानिक व ग्रामीण भागातील नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने तातडीने दुरुस्ती कामे करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे गेल्या दोन आठवड्यापासून हलक्या तर कधी दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याच्या आगमनाबरोबर स्थानिक व ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवर वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू झाला आहे. येथील वीजवाहिन्या अत्यंत जुन्या झाल्या आहेत.विद्युत रोहीत्रामध्ये दोष निर्माण होऊन केव्हाही वीज जाते. वीज गेल्यानंतर नागरिक तक्रार देतात. परंतु, त्याची महावितरणाचे कर्मचारी तातडीने दखल घेत नाही. त्यामुळे, वीज गेल्यानंतर ती केव्हा येईल ? याची खात्री नसल्याने स्थानिक व ग्रामीण भागातील नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे. पावसाळ्यात सततच्या खंडित वीजप्रवाहामुळे विद्युत पंप बंद होऊन शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. विजेचा लंपडाव सुरु असताना वीज देयक मात्र ठरल्याप्रमाणे येते. ते भरावेच लागते. त्यामुळे, महावितरणने तातडीने लक्ष देऊन स्थानिक व ग्रामीण भागात वीजपुरवठा अखंडित सुरू ठेवावा. नागरिकांवर आंदोलनाची वेळ आणू नये, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. *बॉक्स* सध्या परिस्थितीत पावसाळ्याचे दिवस नुकतेच सुरू झाले परंतु महावितरण कंपनीने अद्यापही झाडाची योग्य ती कटिंग व विद्युत ताराजवळ आजूबाजूला छाटणी न केल्याने नेहमी नेहमी लाईट जात आहे ,त्यामुळे थोडासा जरी पाऊस झाला तरी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. *सौ ज्योतीताई बाजड गृहिणी केशवनगर तालुका रिसोड*

Post a Comment

0 Comments