Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज पूल चौकात महाराजांचा आश्वरुढ पुतळा उभा करावा - रविकिरण इंगवले

 छत्रपती शिवाजी महाराज पूल चौकात महाराजांचा आश्वरुढ पुतळा उभा करावा - रविकिरण इंगवले

-------------------------------------

कोल्हापूर  प्रतिनिधी

पांडुरंग फिरंगे

-------------------------------------

छत्रपती शिवाजी महाराज पूल चौकात कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर

छत्रपती शिवाजी पुलावर महाराजांचा आश्वरुढ पुतळा उभा करा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख- रविकिरण इंगवले यांनी निवेदनाद्वारे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे केली आहे.

जुना बुधवार पेठ पंचगंगा नदीला ऐतिहासिक प्रवेशव्दारावर

छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा उभा करन्यात यावा.

दख्खनचा राजा जोतिबा, आई अंबाबाई आणि कोल्हापूरातील तीर्थक्षेत्राच्या संतजनांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज नरवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य गाथेची साक्षीदार असणारी रणभूमी

बरोबरच छत्रपती शाहू महाराजांच्या समतेचा विचार भारताला आदर्शवत ठरलेल्या करवीर भूमीने कला-क्रीडा-सहकार-उद्योग सांस्कृतिक क्षेत्रात स्वकर्तृत्वावर भरारी

घेतलेली आहे. अशा शुरवीर ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या कोल्हापूरच्या वरददायीनी ठरलेल्या पंचगंगा नदीच्या काठावर जुने व प्राचीन कोल्हापूरत असणाऱ्या ब्रम्हपूरी टेकडीजवळ हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा

आश्वारुढ भव्य पुतळा असणे गरजेचे आहे. राज्यातून तसेच देशभरातून कोल्हापुरात अनेक भाविक पर्यटक दर्शनासाठी येत असतात.

किल्ले पन्हाळगड, विशाळगड आणि पावनगड आणि स्वराज्य जल

आरमार साक्ष असणारी कोकण भूमीच हे प्रवेशव्दावर असून शुरवीरांचा इतिहास ढफतालावर वाण्याबरोबरच समस्त हिंदूजनांच्या मनात अभिमानाची चेतना जागृत

करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोल्हापूरतल्या ऐतिहासिक वैभवात अग्रभागी ठरणार आहे.

या निवेदनाव्दारे सामाजिक समतेचा संदेश जोपासत ऐक्याचा विचार

जनतेमध्ये देणारे रुजवणारे छत्रपतीचे वारस व नुतन खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या मागणीचा प्राधान्याने विचार करावा. अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रवीकिरण इंगवले यांनी निवेदनाद्वारे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे केली आहे.

000000000

Post a Comment

0 Comments