करवीर मतदारसंघात विकास कामासाठी ३० कोटी ८५ लाखाचा निधी - चंद्रदीप नरके.

 करवीर मतदारसंघात विकास कामासाठी ३० कोटी ८५ लाखाचा निधी - चंद्रदीप नरके.

----------------------------------

पन्हाळा प्रतिनिधी 

 आशिष पाटील 

----------------------------------

अर्थसंकल्पात मंजूर झाल्याची माहिती माजी आमदार चंद्रदीप नरकेंची माहिती.

- महाराष्ट्र शासनाच्या जुलै २०२४/२५ च्या पुरवणी अर्थसंकल्पात करवीर मतदारसंघासाठी ३० कोटी ८५ लाखाचा निधी मंजूर झाल्याची माहीती माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली. या निधी मंजूरीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले असल्याचे नरके यांनी सांगितले. 

    यामध्ये मतदारसंघातील कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा तालुक्यातील कळे तळेवाडी कुंभारवाडी रस्ता प्रजिमा ७८ कि.मी. ०/०० ते १/०० या गांवातील लांबीची सुधारणा करणे. (काँक्रीटीकरण व गटर्स बांधकाम करणे) ७ कोटी २५ लाख , कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा तालुक्यातील कोल्हापूर चिखली वरणगे पाडळी यवलूज बाजारभोगांव करंजफेण अणुस्कुरा रस्ता रा मा १९३ कि.मी. १७/३०० ते १८/३०० ची रुंदीकरणासह मजबुतीकरण करणे. (पुनाळ गांवाजवळ आर.सी.सी.गटर्स बांधणेसहीत) १ कोटी ५० लाख रुपये, कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा तालुक्यातील कोल्हापूर चिखली वरणगे पाडळी यवलूज बाजारभोगांव करंजफेण अणुस्कुरा रस्ता रा मा १९३ कि.मी. १२/०० ते १२/७०० व १८/३०० ते २१/३०० चे मजबुतीकरण करणे. (भाग - म्हाळूंगे ते पुनाळ गांवाजवळ) २ कोटी ८० लाख रुपये, कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा तालुक्यातील कोल्हापूर चिखली वरणगे पाडळी यवलूज बाजारभोगांव करंजफेण अणुस्कुरा रस्ता रा मा १९३ कि.मी. २६/३०० ते ३०/३०० चे मजबुतीकरण करणे. (भाग - बाजारभोगांव ते पोर्ले) २ कोटी ८० लाख रुपये, कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा तालुक्यातील रा मा १७७ ते रा मा १९१ ला मिळणारा कोपार्डे पडळ माजगांव पोर्ले रस्ता प्रजिमा 18 कि.मी. ३/३०० ते ४/३०० चे रुंदीकरणासह मजबुतीकरण करणे. (भाग - सातार्डे ते पडळ कमान) १ कोटी रुपये, कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा तालुक्यातील सुळे ते आकुर्डे रस्ता ग्रा.मा. क्र. ४८ वर धामणी नदीवर पुलाचे बांधकाम करणे. ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर ७ कोटी ५० लाख रुपये, कोल्हापूर शहर रा म क्र. ४ जाजल पेट्रोल पंपा पासून कणेरी गिरगांव रा.मा. १९६ नंदवाळ वाशी महे कोगे कुडित्रे फॅक्टरी रा.मा. १७७ वाकरे फाटा खुपीरे अ कि.मी. ३१/२०० ते ३५/९०० रस्ता रुंदीकरण मजबुतीकरण व काँक्रीटीकरण करणे. (खुपीरे गांवाजवळ) यवलूज वरणगे केर्ली निगवे टोप नागांव मौजे वडगांव हेर्ले रा म क्र. २०४ रुकडी फाटा रुकडी चिंचवाड वसगडे सांगवडे हलसवडे विकासवाडी ते रा.म.क्र. ४ जाजल पेट्रोल पंपापर्यंत कोल्हापूर शहर वळण मार्ग राज्य मार्ग क्र.१९४-५ कोटी रुपये, रा.मा.क्र. १९४ पासून निगवे शाळेजवळून कुशिरे पोहाळे तर्फ आळते गिरोली केखले पोखले ते रा.मा.क्र. १९२ ला मिळणारा प्रमुख जिल्हा मार्ग क्र. १२ कि.मी. १/०० ते २/०० मध्ये रस्ते सुधारणा करणेसह बांधीव गटर्स करणे व रस्ते सुरक्षा बाबी करणे. ता. करवीर १ कोटी रुपये, आरे सावरवाडी ग्रा.मा. २१२ रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे. ता. करवीर, जि. कोल्हापूर २ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आमदार नरके यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.