महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर करावा सेट परीक्षार्थीचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

 महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर करावा सेट परीक्षार्थीचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.

------------------------------ 

रिसोड प्रतिनिधी 

रणजीतसिंह ठाकुर 

------------------------------- 

वाशिम : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट विभागाच्या वतीने दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी 39 व्या सेट परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरीता 17 शहरातील विविध महाविद्यालयात करण्यात आले होते. प्रत्यक्ष निकाल तयार करण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट विभागाच्या वतीने पूर्णत्वास आले असून एस.ई.बी.सी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षण लागू करावे की कसे याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठाच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. परंतु अजूनही राज्य शासनाकडून विद्यापीठाला कुठलेही मार्गदर्शन प्राप्त झालेले नाही. त्यामुळे तीन महिने होऊनही अजूनही सेट परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. अनेक विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत आणि जर वेळेत महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल लागला नाही तर अनेक विद्यार्थी या पदापासून वंचित राहतील. त्यामुळे लवकरात लवकर सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय , वाशिम यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रा.डॉ. प्रसेनजित चिखलीकर , युवराज राठोड , प्रदीप पट्टेबहादुर , शुभम सुर्वे यासह विविध समाजकार्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.