रिसोड तालुक्यातील अनेक महसुल विभागातील शेतीला दमदार पावसाची प्रतिक्षा..!.(कुठे पिकांची डवरणी तर कुठे नुकतेच पिक अंकुरलेले)

 रिसोड तालुक्यातील अनेक महसुल विभागातील शेतीला दमदार पावसाची प्रतिक्षा..!.(कुठे पिकांची डवरणी तर कुठे नुकतेच पिक अंकुरलेले)

--------------------------------------

रिसोड प्रतिनिधी 

रणजीत ठाकूर 

--------------------------------------

पावसाळा सुरू होऊन  एक महिना संपत आला मृग नक्षत्र संपुन आद्रा नक्षत्र ही संपत आले तरीही तालुक्यातील भर जहागीर, वाकद,गोभणी,मांगुळझनक, चिखली,रिठद परिसरात पाऊस दगा देत आहे.आकाशात ढग दाटुन येतात.परंतु सुसाट्याच्या  वा-याने क्षणात पावसाचे ढग गायब होतात.मणातली अभिलाशा मनातच विरते पाऊस रिमझीम पडतो न पडतो पुन्हा गायब आणि आकाश निरभ्र होते.निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित पाऊस पडत नसल्याने बळीराजा दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे,

   मागील तीन वर्षाची परिस्थिती बघता खरीपाच्या आरंभाला पीक बाळसे धरेपर्यंत पाऊस मेहरबान आसतो.नंतर माञ दोन-तीन नक्षञ पाऊस अक्षरश: रडवतो. याही हंगामात भर जहागीर, वाकद,मांगुळझनक,मसलापेन,चिखली,रिठद या गावांच्या परीसरातील तीच अवस्था असुन आद्राॅ नक्षञ सुरू असुन तीन नक्षत्र आटोपते झाले तरीही ही पाऊस दगा देत आहेत. 

      बाजारभावाचा अभ्यास करता दोन पैसे आधिक मिळविण्याच्या आशेने सोयाबीन,हळद पिकांचा पेरा यंदा वाढला आहे.या वाणांची विशिष्ट दिवसातच पेरणी केली तर अपेक्षित उत्पन्न मिळते माञ फसव्या मान्सुनमुळे आधिक उन्पन्नाची आशा फोल ठरत आहे. शेतकरी नव्याने काही करू अपेक्षितो माञ परीस्थीतीने सर्व काही मातीमोल ठरत आहे.

    प्रशासन माञ कागदावरच अंदाज बांधत आहे,पिक कर्ज रकमेच्या दोन टक्क्यानी शेर रक्कम कोऑपरेटिव्ह बंकेने काढण्याचा आदेश दिला आहे. दोन टक्के कर्जाच्या रकमेवरील पिक विम्याचा हप्ता खुप मोठी रक्कम होत असुन शेतकऱ्यांना नाहक गुंतवुन त्याची आधिक लुट केली जात आहे.

 लोकप्रतिनिधीनी या मुदयाला हात घालुन शेतकऱ्यांच्या भावना समजुन घ्याव्या,आशा प्रकारची मागणी होत आहे,पावसाने पाठ फिरवल्याने परिसरातील बळीराजा पुरता हतबल झालेला आहे.ज्यांंच्या कडे सिंचनाची व्यवस्था आहे.अशा शेतकऱ्यांनी पेरणी आटोपती घेतली माञ पावसाच्या प्रतिक्षेतील शेतकऱ्यावर अर्थिक संकट घोंगावत आहे.कुठे पीक डिवरणीला आले तर कुठे नुकतेच अंकुरत आहे.गेल्या दोन दिवसात झालेल्या थोड्याफार पावसाने काही भागातील पिकांना जिवदान मिळाले पंरतु काही भागात पावसाची प्रतिक्षा माञ कायम आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.