सांगली. सेल्फीचा मोह जीवावर घेतला, प्रेयसी वाचले मात्र तो नदीत बुडाला.
सांगली. सेल्फीचा मोह जीवावर घेतला, प्रेयसी वाचले मात्र तो नदीत बुडाला.
---------------------------------
मिरज प्रतिनिधी
राजू कदम
---------------------------------
सांगलीतील कृष्णा नदीमध्ये प्रेयसी सोबत सेल्फी काढण्यासाठी गेलेला प्रियकर बुडाल्याची घटना प्रियकर आणि प्रेयसी असे दोघेही सकाळी सांगलीतील बंधाऱ्यावर सेल्फी काढण्यासाठी गेले होते .
परंतु कृष्णानेच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ झाल्याने पाणी बंदरावरून वाहू लागले. त्यावेळी प्रेयसी मात्र बंदरावरून काठावर आली.
परंतु प्रियकर त्याच ठिकाणी बंदरावरून सेल्फी काढत होता. पाणी पातळी वाढल्याने संबंधित करून देखील काठावर येऊ लागला तितक्यात बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने त्याचा पाय घसरल्याने तो कृष्णा नदीत बुडाला.
घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक दाखल झाले असून, बुडालेल्या तरुणाचा सध्या शोध सुरू आहे. मासेमारीसाठी गेलेल्या आठ वर्षाचा मुलाचा कृष्ण नदी मध्ये बुडून मृत्यू झाला होता.
आता सेल्फी काढत असताना तरुण बुडण्याची ही दुसरी घटना घडली आहे..
Comments
Post a Comment