Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुदाळ तिट्टा ते मुदाळ रस्ता व गटारीचे काम एक महिन्याच्या आत करणार सार्वजनिक बांधकाम खाते मनसेच्या आंदोलन मागे.

 मुदाळ तिट्टा ते मुदाळ रस्ता व गटारीचे काम एक महिन्याच्या आत करणार सार्वजनिक बांधकाम खाते  मनसेच्या आंदोलन मागे.

-----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

-----------------------------------------

भुदरगड तालुक्यातील मुदाळ तिट्टा ते मुदाळ हा रस्ता गेली दोन वर्ष काम अपूर्ण असल्याने ते काम पूर्ण करावे व आरसीसी गटारीचे काम तातडीने चालू करावे या मागणीचे निवेदन भुदरगड सार्वजनिक बांधकाम खात्याला तीन जुलै पूर्वी चालू न केल्यास तीन जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यासमोर उपोषण बसणार असल्याचा इशारा देण्यात आला होता असे भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी सांगितले

त्यानुसार भुदरगड सार्वजनिक बांधकाम खात्यासमोर भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील व मनसेचे कार्यकर्त्या समवेत बसले होते


यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता एस बी इंगवले यांनी मुदाळ तिट्टा व मुदाळ या रस्त्याचे व आरसीसी गटारीचे काम एक महिन्याच्या आत करून देतो असे लेखी आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेत असल्याचे मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी जाहीर केले

या उपोषणास भुदरगड तालुका मनसेचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील राधानगरी तालुका मनसेचे अध्यक्ष राहुल कुंभार अनिल पाटील बाळासाहेब देवळे शिवाजी बलुगडे दत्तात्रय पाटील राहुल पाटील इत्यादी कार्यकर्ते हजर होते

Post a Comment

0 Comments