कुंभी कासारी बँकेने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभातून समाज उपयोगी उपक्रम राबवला बँकेचे शेड्युल्ड बँकेत रुपांतर व्हावे.
कुंभी कासारी बँकेने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभातून समाज उपयोगी उपक्रम राबवला बँकेचे शेड्युल्ड बँकेत रुपांतर व्हावे.
-----------------------------------
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
-----------------------------------
माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे वर्धापन दिन कार्यक्रमात गौरव उद्गार.
कुंभी कासारी बँकेने येत्या चार वर्षात २०० कोटी ठेवींचा टप्पा पार करावा, बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीस शुभेच्छा देताना या बँकेचे शेड्युल्ड बँकेत रुपांतर व्हावे, बँकेच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभातून बँकेने समाजोपयोगी उपक्रम राबवल्याचे गौरवोद्गार कुंभी कासारीचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी काढले.
कुडित्रे (ता. करवीर) येथील शेतकरी सांस्कृतिक भवनात झालेल्या कुंभी कासारी सहकारी बँकेच्या ४८ व्या वर्धापनदिन आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात माजी आमदार नरके प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष अजित नरके होते.
माजी आमदार नरके यांनी भाजीविक्रेत्यांपर्यंत ऑनलाइन पेमेंट पोहोचण्यासाठी बँकांनी मोठा वाटा उचलल्याचे सांगून येत्या काही दिवसात बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानाची क्रांती होणार असल्याचे सांगितले.
तात्यासाहेब मोहिते प्रशिक्षण केंद्राचे व्याख्याते दीपक फडणीस यांनी "सभासद व त्यांची जबाबदारी" या विषयावर बोलताना बँकिंग क्षेत्रात डिजिटल क्रांती झाली असून त्याचा वापर जरूर करावा, मात्र अनोळखी लिंककडे आकर्षित होऊ नका आणि जास्त परताव्याच्या भुलभुलैय्याला बळी पडू नका,तसेच ॲपच्या जाळ्यात फसू नका, सोशल मीडियावर मीडियाचा अनावश्यक वापरत टाळावा असे आवाहन केले. शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय असणे गरजेचे असल्याचे सांगून कुंभी कासारी बँकेच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांनी प्रास्ताविकात सुवर्ण महोत्सवी वाटचाल करणारी ही बँक देशातील ४५० आर्थिक सक्षम असणाऱ्या बँकांमध्ये कुंभी कासारी बँकेचा समावेश असल्याचे सांगितले. येत्या काही दिवसात ऑनलाईन बँकिंगकडे जाण्यास कुंभी बँक सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार नरके व अन्य मान्यवरांच्या हस्ते राज्यसेवा लोकसेवा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, इयत्ता १० वी,१२ वी आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह,बुके आणि रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एस.राऊत,आभार उपाध्यक्ष अरुण पाटील,सूत्रसंचालन बी.व्ही.माळी यांनी केले. या कार्यक्रमाला कुंभीचे व्हाईस चेअरमन राहुल खाडे, गोकुळचे संचालक एस.आर.पाटील,युवा नेते राजवीर नरके, कुंभी कारखान्याचे संचालक, बँकेचे संचालक विलास देसाई,के.डी.पाटील प्रा.एस.पी.चौगले, हिंदुराव मगदूम, मारुती चौगले,रंगराव पाटील, रणजीत पाटील,श्रीकांत पाटील,आनंदराव माने, पंडित वरुटे प्रदीप नाळे यांच्यासह सभासद, ग्राहक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
कुंभी कासारी बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार करताना माजी आमदार चंद्रदीप नरके, सोबत बँकेचे अध्यक्ष अजित नरके ,उपाध्यक्ष अरुण पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन राहुल खाडे, राजवीर नरके व संचालक मंडळ उपस्थित होते
Comments
Post a Comment