बाजारभोगावं (ता. पन्हाळा )मुसळधार पावसामुळे नदीकाठावरील शेकडो एकर मधील पिके पाण्याखाली गेली आहेत तर माळरानावरील पिकांची उंची सततच्या पावसामुळे खुंटली आहे.परिणामी जनावरांच्या ओल्या चाऱ्यांची टंचाई निर्माण झाली आहे.

 बाजारभोगावं (ता. पन्हाळा )मुसळधार पावसामुळे नदीकाठावरील शेकडो एकर मधील पिके पाण्याखाली गेली आहेत तर माळरानावरील पिकांची उंची सततच्या पावसामुळे खुंटली आहे.परिणामी जनावरांच्या ओल्या  चाऱ्यांची टंचाई निर्माण झाली आहे.

 -----------------------------------------

पन्हाळा प्रतिनिधी 

आशिष पाटील

 -----------------------------------------

      शेतीधंद्यासोबत शेतकरी दूध व्यवसाय करत असतो. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दूध बिलातून संसाराचा गाडा चालवत असतो. त्यासाठी ओल्या व सुक्या चाऱ्याची तजवीज शेतकरी करत असतो. ओला चारा म्हणून हत्ती गवत व ऊसांच्या पाल्याचा वापर करत असतो.यंदा कासारी व जांभळी खोऱ्यातीत पावसांची एकसारखी रिपरिप सूरू आहे दरवर्षीच्या पावसांची सरासरी  जुलै महिन्यातच पुर्ण झाली आहे दरम्यान जुलै महिन्यात कासारी व जांभळी नदीस पूर आला आहे.मुसळधार पावसामुळे नदीच्या पुराचे पाणी मागील आठ दिवसपासून उतरले नाही.हे पाणी नदीकाठावरील संपूर्ण शिवारामध्ये पसरले आहे परिणामी ऊसाचा पाला उपलब्धता कमी झाली आहे

    तर  अति पावसामुळे माळरानावरील ऊसांवर करपा  पडून ऊसांची पाने करपली आहेत. तर पावसाळ्यात डोंगरात मुबलक प्रमाणात हिरवा चारा (वैरण) उपलब्ध होतो,पण तोसुध्दा गव्यांच्या कळपाकडून फस्त केला जात आहे.परिणामी जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची टंचाई जाणवू लागली आहे.त्यामुळे चिव्याचा पाला, दिंडीच्या झाडाची पाने आदीसह  इतर झाडांच्या  पानांचा वापर करून  जनावरांना घालत असल्याने दुभत्या जनावरांच्या दुधावर परिणाम झाला तसेच जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.


कोट

  माझ्याकडे सात जनावरांच्या असून पुराच्या पाण्याखाली हिरवी वैरण कुजली  तर माळरानावरील वैरण ही उपलब्ध असणारी संपली त्यामुळे जनावरांना सुकी वैरण व सायलेस बॕग मधील चारा वापरत आहे.हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून दुभत्या जनावरांना पुरेसा चारा मिळत नसल्यामुळे दूध उत्पादनात घट आली.

       सतीश पाटील दूध उत्पादक

फोटोओळ 

वैरण टंचाईमुळे जनावरांना झाडाचा पाल्याचा बिंडा आणताना एक  शेतकरी

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.