Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शाहुवाडी तालुक्यात धक्कादायक घटना सख्या भावांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू.

 शाहुवाडी तालुक्यात धक्कादायक घटना सख्या भावांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

शाहुवाडी तालुका प्रतिनिधी 

आनंदा तेलवणकर

--------------------------------------

 महावितरण चा भोगळ कारभार शेतकऱ्यांचा जातोय नाहक बळी.

शाहुवाडी : कोपार्डे येथील सुहास कृष्णा पाटील वय ३६ व स्वप्निल कृष्णा पाटील वय वर्षे ३१ या दोघांचा शेतात तन नाशक मारत असताना विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला बुधवारी दुपारी शेतामध्ये तन नाशक मारत असताना सुहास यास विजेचा धक्का बसला त्याच त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याला पाहण्यासाठी गेलेल्या स्वप्निल याला ही विजेचा धक्का बसून त्याचा ही जागीच मृत्यू झाला हे दोघे जण घरी अजून का आले नाहीत म्हणून त्यांचे वडील कृष्णा पाटील हे पाहण्यासाठी शेतामध्ये गेले असता त्यांना ते दोघे मृत्य अवस्थेत आढळून आले दरम्यान या घटनेची माहिती शाहुवाडी पोलिसांना मिळताच शाहुवाडी पोलीसांनी घटना स्थळी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छदना साठी ग्रामीण रुग्णालय मलकापूर येथे पाठवणेत आलेत रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृत्यदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले दोन्ही मुलांच्या मृत्यूने पाटील घराण्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तसेचे कोपार्डे गावावर शोककळा पसरली आहे तसेच सुहास यांचा विवाह झालेला असुन त्यांच्या पश्चात आई वडील बहीण व पत्नी असा परिवार आहे

Post a Comment

0 Comments