करवीर पूर्व पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मालोजी पाटील तर उपाध्यक्षपदी सुरेश मसुटे यांची निवड.
करवीर पूर्व पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मालोजी पाटील तर उपाध्यक्षपदी सुरेश मसुटे यांची निवड.
-------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-------------------------------
करवीर पूर्व पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक तरुण भारतचे मालोजी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरी च सुरेश मसुटे यांची तर सचिव पदी मदन अहिरे आणि खजानिसपदी प्रदीप पवार यांची निवड झाली.
करवीर पूर्व पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष बाबासाहेब नेर्ले यांनी रोटेशन पद्धतीने वर्षभरातील कामाचा आढावा देत आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला . त्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष नवीन कार्यकारणीची संघाच्या बैठकीत नियुक्त करण्यात आली.
करवीर पूर्व पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष दैनिक लोकमतचे पत्रकार बाबासाहेब नेर्ले व दैनिक सकाळचे उपाध्यक्ष प्रमोद ढेकळे यांनी रोटेशन प्रमाणे आपला पदाचा राजीनामा देऊन नवीन कार्यकारणी निवडीसाठी अनुमोदन दिले. संघाच्या झालेल्या आढावा बैठकीत नवीन अध्यक्षपदी दैनिक तरुण भारतचे मालोजी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरी चे सुरेश मसुटे यांची निवड झाली. सचिव म्हणून न्यूज 24 चे संपादक मदन आहिरे यांची एकमताने फेर निवड झाली. खजानिस पदी दैनिक राष्ट्रगीत चे पत्रकार प्रदीप पवार यांची निवड करण्यात आली.
यावेळी माजी अध्यक्ष बाबासाहेब नेर्ले, संतोष माने, आनंद गुरव, मोहन सातपुते, यांनी मनोगते व्यक्त केली. या बैठकीमध्ये सामाजिक, राजकीय, तसेच पत्रकारांसमोरील आव्हाने आणि बातमीदारी याविषयी सुसंवाद झाला. या बैठकीसाठी तरुण भारतचे संतोष माने, दैनिक सिंधुदुर्ग समाचार चे अनिल निगडे, बी न्यूज चे अनिल उपाध्ये, दैनिक लोकमतचे संजय वर्धन, दैनिक पुढारीचे आनंद गुरव, दैनिक पुण्यनगरी चे विजय कदम, एस न्यूज चे विशाल फुले, राजेंद्र शिंदे, दैनिक महासत्ताचे संदीप शिंदे, न्यूज कोल्हापूरचाचे राहुल मगदूम, जी 24 तासचे राजेंद्र सूर्यवंशी, फ्रंटलाईन न्यूज चे सहसंपादक शशिकांत कुंभार, दैनिक बंधुताचे नितीन कोळी यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment