Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भणंग प्राथमिक शाळेचा जिल्ह्यात डंका.

 भणंग प्राथमिक शाळेचा जिल्ह्यात डंका.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

भणंग प्रतिनिधी

प्रमोद पंडीत

---------------------------------

सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२३ - २४ मध्ये घेण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळा स्पर्धेत जावली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या भणंग प्राथमिक शाळेने उच्च प्राथमिक शाळा गटात सातारा जिल्ह्यात व्दितीय क्रमांक पटकवला सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आता यात भणंग शाळेने यश संपादन केले आहे . सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने मा स्पर्धेतील विजेत्या शाळांचा गौरव करण्यात येणार आहे .

     स्वच्छ सुंदर उपक्रमशील व गुणवत्तापुर्ण शाळा स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या भणंग प्राथमिक शाळेत विविध नावीन्यपुर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आसून शाळेने विविध शासकीय स्पर्धेत व स्पर्धे परीक्षेत धवधवीत यश संपादन केले आहे . लोकसहभागातून भौतिक सुविधांसह गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले आहेत भणंग शाळेने शाळेच्या शताब्दी वर्षात गुणकत्तापुर्ण शाळा स्पर्धेत सातारा जिल्हात व्दितीय क्रमांक पटकवाला असल्याने शाळेचे मुख्याध्यापक डी टी धनावडे , पदवीधर शिक्षक अशोक लकडे , आशा साळुंखे , विश्वास भिसे ' शंकर ओबळे , या शिक्षकांसह विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

या यशा बद्दल ग्रामस्थांनी व सरपंच गणेश जगताप यांनी कंदी पेढे वाढून आनंद उत्सव साजरा केला . सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी गगराजन , शिक्षणाधिकारी शबनम मुजावर , डाएटचे प्राचार्य डॉ अमोल डोंबाळे ' गर विकास अधिकारी मनोज भोसले , परिक्षा परिषदेचे माजी सहआयुक्त रमेश चव्हाण , माजी गटशिक्षणाधिकारी संभाजी जंगम ' हनमंतराव जाधव अरुणा यादव , गट शिक्षणाधिकारी संजय धुमाळ , धनंजय चोपडे , रवींद्र खंदारे ' आनंद पळसे ' सन्मती देशमाने ' शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे ' वनिता मोरे , कल्पना तोडरमळ केंद्रप्रमुख अरविंद दळवी , संपत धनावडे , विजय सपकाळ ग्यान प्रकाश फाउंडेशनचे प्रशांत भोसले , श्रीधर भोसले / माजी जिल्हा परिषदेचे सदस्य मच्छिद्रनाथ क्षीरसागर यांनी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ यांचे अभिनंदन केले आहे .

Post a Comment

0 Comments