कुंभोज वारणा नदी परिसरात मगरींचा वावर.
कुंभोज वारणा नदी परिसरात मगरींचा वावर.
------------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
-------------------------------------
कुंभोज तालुका हातकलंगले येथील वारणा नदी शेजारी असणाऱ्या गवती कुरणामध्ये सध्या मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे सदर मगरीनी गवती कुरणाचा आसरा घेतला असल्याचे चित्र दिसत आहे. परिसरातील सर्व शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला असून, मगरीने गवती कुरणामध्ये आपले ठाण मांडल्याने शेतकऱ्यांना सदर परिसरात जाऊ नये असे आव्हान ग्रामपंचायत कुभोज यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment