पुलाची शिरोलीत चोरीचा प्रयत्न,नागरिकांत भिंतीचे वातावरण.

 पुलाची शिरोलीत चोरीचा प्रयत्न,नागरिकांत भिंतीचे वातावरण.

--------------------------------------

हातकणंगले प्रतिनिधी 

 विनोद शिंगे

------------------------------------

पुलाची शिरोलीत चोरीचा प्रयत्न सुरु आहे. तुम्ही लवकर या अशी विनंती करुनही शिरोली पोलिसांनी केले बे-दखल.अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांना पकडण्यासाठी नागरीकांनीच बजावली पोलिसांची भूमिका.

येथील माळवाडी भागातील सावंत कॉलनीमध्ये दोन दिवसापूर्वी चार चोरटे मध्यरात्री चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असताना एका नागरिकास शंका आली. त्यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रमणध्वनी वरून ड्युटीवर असलेल्या ठाणे अंमलदारास याची माहिती दिली पण संबंधित ठाणे अंमलदाराने या फोनची कसलीही दखल घेतली नाही. चोरटे मात्र स्क्रॅप चोरी करून माल घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी येथील काही नागरिकांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून स्क्रॅप चोरणाऱ्या व्यक्तींचा व चोरीचा माल घेणाऱ्यांचा शोध घेतला त्यांनी चोरीचा माल आणि चोरी केल्याची कबुली दिली शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास सावंत कॉलनी मधील वड्याजवळ शिवसंदेश तरुण मंडळाच्या नजीक काही चोरटे रस्त्यावरून येरजाऱ्या मारत असल्याचा संशय येतील एका नागरिकाला आला. त्याने त्वरित भ्रमणध्वनी वरून शिरोली पोलीस ठाण्यात याची माहिती दिली व चोरटे चोरी करत आहेत तुम्ही त्वरित या असे सूचना केली. पण त्या दिवशी आपले कर्तव्य बजावत असलेल्या ठाणे अंमलदाराने फोनवरून घटनेची माहिती घेतली. पण संबंधित ठाणे अंमलदाराने पोलीस ठाणे सोडून घटनास्थळी जाण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे त्या चोरट्याने माल चोरून तेथीलच स्क्रॅप व्यवसाय असलेले रुस्तम खान याचेकडे चोरीचा माल घेतल्याचे नागरिकांनी विचारणा केली. त्यावेळी रुस्तमखानने सदरचा माल आपण विकत घेतल्याचे कबूल केले व ज्यांनी हा माल चोरला त्या संबंधित तीन चोरट्यांना हजर केले. सदरच्या चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची चर्चा सुरू असतानाच ते चोरटे तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. रुस्तमखानने चोरलेला माल स्वतःच्या रिक्षातून शिवशाही अपार्टमेंट मधील मांगलेकर यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर खानच्या स्क्रॅप गोडाऊनची झडती घेतली असता त्या ठिकाणी बऱ्याच केबल काढून त्याचे स्क्रॅप गोळा केल्याचे तसेच ॲल्युमिनियमच्या मोठमोठ्या केबल निदर्शनास आल्या .यापूर्वी शिरोलीतील पंचगंगा नदीवरील विद्युत मोटारीच्या अनेक केबल चोरून या टोळीने  रुस्तम खानला विकल्या असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. रुस्तम खानने स्क्रॅप चोरणाऱ्यांची नावे योगेश गजानन भोसले, सुभाष जाधव व साळुंखे असे असल्याची माहिती दिली. एकूणच रात्रीच्या वेळी चोरीची घटना घडत असताना शिरोली पोलिसांना याबाबतची तात्काळ माहिती देण्यात आली. पण पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे अशी घटना घडली. मग हे पोलीस नागरिकांच्या जीवाची आणि मालमत्तेचे संरक्षण कसे करणार ?व नागरिकांना न्याय काय देणार? अशी चर्चा संपूर्ण गावातून सुरू आहे.

 या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई करावी अशी  मागणी होऊ लागली आहे.

हा नागरी वस्तीतील  स्क्रँप व्यवसाय बंद करण्याबाबतचा तक्रार अर्ज तंटामुक्त समितीकडे आला आहे. याबाबत जागा मालक मेणेकीरी यांनी पंधरा दिवसात बंद करतो म्हणून तंटामुक्त समितीकडे लेखी दिले आहे. पण तीन महिने झाले अद्याप बंद केलेला नाही. तरी तो बंद करण्या संदर्भात तत्काळ कार्यवाही करणार असल्याचे तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील यांनी नागरीकांना सांगितले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.