ॲड.नकुल देशमुख यांच्या नेतृत्वात बक्कर कुरेशी समाजांच्या ३०० कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश.
ॲड.नकुल देशमुख यांच्या नेतृत्वात बक्कर कुरेशी समाजांच्या ३०० कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश.
---------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
---------------------------
भाजप नेते मा.मंत्री अनंतराव देशमुख यांच्या उपस्थितत प्रवेश.
. रिसोड येथे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री लोकनेते अनंतरावजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड नकुल अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्वात रिसोड शहर व तालुक्यातील ३०० बक्कर कुरेशी समजाच्या कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला.
रिसोड शहर व तालुक्यातील बक्कर कुरेशी समाजाच्या तब्बल ३०० नागरिक व युवकांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. भाजप नेते ॲड नकुल देशमुख यांनी प्रवेश घेतलेल्या सर्वांचे पक्षाचा शेला घालून भाजपा मध्ये स्वागत केले.देशाचे लाडके पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेब,महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेतृत्व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणविस साहेब यांच्या नेतृत्वात देश,राज्य व विधानसभेत मोठ्या संख्येने होत असलेली विकास काम व आमचे प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या कार्यकर्ता हाच परिवार कार्यशैलीमुळे कार्यकर्त्यांचा ओघ भाजपमध्ये विधानसभेत अधिकच वाढतो आहे. त्यामुळे पुढचा काळ हा भाजपचाच असेल यात शंका नसल्याचे भाजप नेते माजी खासदार अनंतराव देशमुख म्हणाले.
नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे मी पक्षात मनस्वी स्वागत करतो. तसेच भाजपकडून सदैव विकासाचे राजकारण केले जाते सर्व पक्ष प्रवेश केलेल्या नागरिकांच्या विकासकामांच्या अपेक्षा भारतीय जनता पक्ष नक्कीच पूर्ण करेल व सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे ॲड.नकुल देशमुख म्हणाले.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खरात, जिल्हा महामंत्री गजाननराव लाटे, गजाननराव पाचरणे, नारायणराव सानप, भैयासाहेब देशमुख, कुंडलिकराव जायभाये, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष अल्ताफ भाई, अल्पसंख्याक मोर्चाचे रिसोड तालुका अध्यक्ष इमरान घनकर, तनवीर भाई ,सादिक भाई सहित भाजपा अल्पसंख्याक मोर्चा रिसोड शहर व तालुका भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment