Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आंतरजातून सांगली तासगाव येथे गांजा विक्रीसाठी येणाऱ्या टोळीला तासगाव पोलिसांनी मुस्क्या आवळल्या.

 आंतरजातून सांगली तासगाव येथे गांजा विक्रीसाठी  येणाऱ्या टोळीला तासगाव पोलिसांनी मुस्क्या आवळल्या.

-----------------------------------------

मिरज कुपवाड  प्रतिनिधी

 राजू कदम

-----------------------------------------

उडीसा राज्यातून तासगावात गांजा विक्रीसाठी येणाऱ्या टोळीला तासगाव शहर पोलिसांनी मुस्क्या आवळल्या. या टोळीकडून 34 किलो 500 ग्रॅम गांजा सह देशी बनावटीचे दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे , एक दोन चाकी, चार चाकी, गाड्या असा एकूण 13 लाख 99 हजार 225 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांच्या अधिक माहितीनुसार अटक केलेल्या डोळ्याकडून हा गांजा उडीसा राज्यातून आणल्याचे सांगण्यात आले. 

गोपनीय खोबऱ्याच्या माहितीनुसार गांजा विक्रीसाठी टोळी तासगावात येणार असल्याची  हेड कॉन्स्टेबल अमरसिंह सूर्यवंशी यांना मिळाले होते. तासगाव पोलिसांनी सापळा रचून भिवघाट रोडवर मनोज संभाजी नागणे वय (वर्ष 30 रा) महूद बुद्रुक, ता सांगोला जिल्हा सोलापूर, हा बिरणवाडी फाट्याजवळ रस्त्याकडे ला मोटरसायकलवर पिशवी घेऊन थांबलेला संशयस्पद आढळून आले. त्याची झडती केली असता त्याच्याकडून चार किलो दहा ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. पोलिसांच्या तपास दरम्यान पोलीस कोठडीत आठ किलो गांजा मित्राच्या घरी ठेवल्याची माहिती दिली, ज्ञानेश्वर महादेव काळे, राहणार नरसिंगपूर ,तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, व्यक्तीकडून गांजा आणल्याचे कबुली केली. 

ज्ञानेश्वरलाही महूद बुद्रुक मधून अटक करण्यात आले. त्याची चौकशी केली असता, त्यांनी वैष्णव नाना लवंड (राहणार नरसिंगपूर, तालुका इंदापूर जिल्हा पुणे) भागीदारी मध्ये गांजा विक्री व्यवसाय करत असल्याचे कबुली दिले. 

पोलीस निरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज वेशीत 25 4 लवंग या ठिकाणी सापळा अर्जुन वैष्णव लवंड, याच्याकडे गावठी पिस्तूल, व त्याचा साथीदार अजय हनुमंत काळे त्याच्याकडून एम एच  09 सी व्ही 44 18 ही चार चाकी गाडी व गाडीतील 22 किलो 450 ग्रॅम गांजा जप्त केला. एकूण जप्त केलेला ऐवज गांजा 34 किलो पाचशे पाच ग्रॅम एक दुचाकी, चार चाकी, गावठी पिस्तूल आणि, दोन जिवंत काढत असे, असा 13 लाख 99 हजार 225 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

पोलीस पोलीस देशी, संदीप घुगे, अपराधीशी रितू खोखर, पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, त्याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, सतीश माने, अमरसिंह सूर्यवंशी, प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप, विवेक यादव, योगेश जाधव, कपिल खाडे, सुहास काबुगडे, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, आदींनी कारवाई केली....

Post a Comment

0 Comments