नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सातारा जिल्हा संघटकपदी प्रा.मंगला उनवणे - साठे यांची नियुक्ती.

 नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सातारा जिल्हा संघटकपदी प्रा.मंगला उनवणे - साठे यांची नियुक्ती.

----------------------------------------

फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र

मेढा प्रतिनिधी

प्रमोद पंडीत

--------------------------------------------

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुबंई या सेवाभावी संस्थेच्या सातारा जिल्हा संघटकपदी, सातारा येथील राष्ट्र सेवा दलाच्या जेष्ठ कार्यकर्त्या प्रा. मंगला उनवणे - साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मंडळाच्या राज्य सरचिटणीस वर्षा विद्या विलास आणि राज्य संघटक अमोल स. भा.मडामे यांनी केले असल्याचे पत्र नुकतेच प्रा. साठे यांना पाठविण्यात आले आहे.प्रा. मंगला साठे या राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून गेली ४५ वर्षे सैनिक पदापासून राज्य सेवा दल सदस्य म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. तसेच अखिल भारतीय अंधश्रदा निर्मूलन समिती,सावित्रीबाई फुले महिला फेडरेशन आणि प्रगतीशील लेखक संघ या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत.त्यांच्या या कार्याचा उचित गौरव म्हणून ही निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडी बद्दल वर्षा विद्या विलास, अमोल स.भा.मडामे, पुणे विभागाचे प्रमुख ऍड.सुरेश सकटे,पुणे जिल्हा संघटक साधना शिंदे,प्रगतशील लेखक संघाचे राज्य सहसचिव कॉम्रेड प्रा.आनंद साठे, सातारा जिल्हा अध्यक्ष सौ.अनिता भोसले,कार्याध्यक्ष संभाजी शिंदे यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.