पूराचे पाणी आलेल्या भागाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी.

 पूराचे पाणी आलेल्या भागाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी.

-----------------------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

रजनी कुंभार.

-----------------------------------------

कोल्हापूर ता.25 : जिल्ह्यामध्ये सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे येणाऱ्या पूर परिस्थीतीचा व आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा दिवसरात्र रस्त्यावर उतरुन काम करत आहे. आज सकाळी शहरात पूराचे पाणी आलेल्या कसबा बावडा उलपेमळा, नागाळा पार्क येथील विन्स हॉस्पीटल परिसर, पंचगंगा तालीम येथील जामदार क्लब परिसर, कदमवाडी, जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत परिसर व चित्रदुर्ग मठातील स्थलांतरीत नागरीकांच्या ठिकाणी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी जाऊन पाहणी केली. यावेळी  अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त पंडीत पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहा.आयुक्त संजय सरनाईक, उप-शहर अभियंता रमेश कांबळे, सतिश फप्पे, आर.के.पाटील उपस्थित होते.


            यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पाणी आलेल्या भागातील नागरीकांनी सतर्क राहूल महापालिकेने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नागरकांनी पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने पाणी येण्यापुर्वीच स्थलांतरीत व्हावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच चित्रदुर्ग मठातील स्थलांतरीत नागरीकांची भेट घेऊन त्यांना महापालिकेकडून मिळत असलेल्या सेवा सुविधांची माहिती घेतली. यावेळी मठातील स्थलांतरीत नागरीकांनी महापालिकेच्यावतीने नाष्टा, चहा व जेवण वेळेवर मिळत असून जेवणाबद्दल प्रशासकांना तक्रार केली. त्यामुळे या ठिकाणी जेवणाचा चांगला दर्जा दयावा, संबंधीत अधिका-यांनी जेवणाची तपासणी करावी अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर महापालिकेच्यावतीने आरोग्य विभागाची वैद्यकीय टिम दैनंदिन तीन वेळा या मठामध्ये येऊन वैद्यकीय तपासणी करुन नागरीकांना मोफत औषधे देत असल्याचे नागरीकांनी सांगितले.


वादळाने पडलेली झाडे उठावाचे काम रात्रभर सुरु


            शहरामध्ये कालपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने मुख्य रस्त्यावर मोठी झाडे कोसळली होती. ही सर्व झाडे बागा खाते व अग्शिमन विभागाच्या जवानांच्या सहाय्याने रात्रभर कटिग करण्याचे काम सुरु होते. दिवसा रहदारीस अडथळा ठरणारी हि सर्व झाडे रात्रीच कटिक करुन त्याचा उठाव करुन रस्ता वाहतूकीस खुला करुन दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.