रिसोड तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर.

 रिसोड तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर.

------------------------------- 

रिसोड प्रतिनिधी

 रणजितसिह. ठाकुर

------------------------------- 

अध्यक्षपदी सतीश मांदळे, उपाध्यक्ष पदी विनोद खडसे व गजानन खंदारे तर सचिव पदी संतोष वाघमारे यांची निवड.


दिनांक 27 जूलै 2024 रोजी रिसोड तालुका पत्रकार संघाची सहविचार सभा आयोजित केली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी रिसोड तालुका पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष प्रा.विजय देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार शंकरराव हजारे, वाशिम जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मोहनराव देशमुख हे होते. या सभेमध्ये नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.यावेळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सतिष मांदळे, उपाध्यक्षपदी विनोद खडसे व गजानन खंदारे, सचिवपदी संतोष वाघमारे, सहसचिवपदी काशिनाथ कोकाटे, कोषाध्यक्षपदी युवराज देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली.

या वेळी प्रा.विजय देशमुख, व मोहनराव देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले, या सभेस ज्येष्ठ पत्रकार शंकरराव हजारे,मोहनराव देशमुख, गजानन बानोरे, प्रभाकर पाटील, जयंत वसमतकर, संतोष वाघमारे, काशिनाथ कोकाटे, विनोद खडसे, गजानन खंदारे, दत्तराव इंगळे, काशिनाथ कोकाटे, युवराज देशमुख,डॉ.प्रशांत सरनाईक,अभय औंढेकर, हजर होते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नवनियुक्त अध्यक्ष सतिष मांदळे यांनी तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी माझी अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानून पत्रकार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर राहील असे सांगितले. या कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन युवराज देशमुख यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.