पावसाचा जोर वाढल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे.
पावसाचा जोर वाढल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे.
-----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
-----------------------------------------
गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर शहर व संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. विशेषतः कोल्हापूर शहर व परिसरामध्ये तसेच राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. काल रात्रीपासून तर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गटारी तुंबलेल्या असल्याने,त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या पाण्यातूनच वाहनांची ये जा चालू असल्याने काही ठिकाणी वाहने बंद पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच अवजड वाहतूक संथ गतीने चालू आहे. या पावसामुळे जनजीवनावरही परिणाम झालेला दिसून येत आहे. रस्त्यावर रहदारी कमी प्रमाणात दिसून येत आहे. पंचगंगा नदीच्या पात्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने आणि या जोरदार पावसामुळे पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने किरकोळ अपघात ही घडले आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने हॉटेल व्यवसायिक तसेच इतर व्यवसायावरही परिणाम झालेला दिसून येत आहे.
Comments
Post a Comment