मडीलगे बुद्रुक च्या महिलांनी केले वेदगंगा नदीचे पाणीपुजन.

 मडीलगे बुद्रुक च्या महिलांनी केले वेदगंगा नदीचे पाणीपुजन.



------------------------------------- 

 गारगोटी प्रतिनिधी 

 स्वरुपा खतकर

------------------------------------- 

           गेल्या आठ दिवसापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गारगोटी कोल्हापूर या मार्गावरील मडीलगे बुद्रुक येथील वेदगंगा नदीच्या पात्रात पाणी वाढल्याने तराळकी रस्त्यावर काल रात्री पाणी रस्त्यावरुन बाहेर पडले.

        या वर्षी आलेल्या पहिल्याच पाण्याचे पूजन महिलांनी केले. नारळ, ओटी भरून, हळदी कुंकू वाहून तिचे पूजन केले. दुथडी भरून वहात असलेली वेदगंगा पाहून महिलांच्या डोळ्यात आनंदअश्रू वाहू लागले.तसेच सर्वाना सुखी ठेव अशी पार्थना केली.

यावेळी सुनीता नामदेव माने, शोभा हजारे, गीता हजारे, रेखा हजारे, सुवर्णा सावंत, विद्या हजारे,सुनीता उत्तम माने,लता टिकले यासह पोलीस पाटील अनील गुरव यांचेसह अनेक महिला उपस्थित होत्या.


        दरम्यान पोलीस प्रशासन गारगोटी, मडीलगे बुद्रुक ग्रामपंचायत, तलाटी कार्यालय, पोलीस पाटील. तरुण युवकांनी वाहतूक बंद कामी प्रशासन विभागाला सहकार्य केले.

     फोटो वेदगंगा नदीच्या पहिल्या पाण्याचे पूजन करताना मडीलगे बुद्रुक येथील महिला वर्ग. फोटो मारुती घाटगे.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.