Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

माणगावचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचा मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते सत्कार.

 माणगावचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचा मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते सत्कार.

-----------------------------------

हातकणंगले  प्रतिनिधी 

विनोद शिंगे

-----------------------------------

बेस्ट सरपंच ऑफ द इयर इन महाराष्ट्र हा पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यातील स्पर्धकांमधून माझ्या हातकणंगले विधानसभा मतदार संघातील माणगाव गावचे सरपंच डॉ. राजू मगदूम यांची निवड करुन प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा परिषद जिल्हास्तरीय आदर्श यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार, आदर्श यशवंत सरपंच पुरस्कार व तालुका आदर्श यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार असे अनेक पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल तसेच माणगाव गावचे ग्रामविकास अधिकारी श्री. बी.बी.राठोड यांनी 35 वर्षे सेवा देऊन सेवानिवृत्त झाले बद्दल माणगाव गावच्या वतीने सत्कार समारंभ कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांचा सत्कार मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक - गोकुळ दूध संघ कोल्हापूर) यांनी केला यावेळी आपण केलेल्या आदर्शवत कामगिरीमुळेच आपला सन्मान झाला आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.


यावेळी हातकणंगले तालुक्याच्या गट विकास अधिकारी शबाना मोकाशी, गावातील प्रमुख मान्यवर, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments