डोंगराची कडा पावसामुळे खचल्याने जानुबाई मंदिरास आणि गावास धोका ग्रामस्थ भीतीच्या छायेत.

 डोंगराची कडा पावसामुळे खचल्याने जानुबाई मंदिरास आणि गावास धोका ग्रामस्थ भीतीच्या छायेत.

-------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

मेढा प्रतिनिधी 

 प्रमोद पंडीत

-------------------------------------------

मेरुलिंग पर्वत रांगेतील भणंग गावच्या डोंगर पठारावर वसलेले कुंभारगणी गाव तालुका जावली या गावातल्या लोकांनी लोक वर्गणी गोळा करुन कुंभारगणी गावचे ग्रामदैवत जानुबाई देवीचे मंदिर बांधण्यात आले आहे ते मंदिर डोंगराच्या कडेवर आहे . आज झालेल्या मुसळधार पावसामुळे मंदिर परिसरातील माती वाहुन जावून मंदिराला धोका निर्माण झाला आहे . व कुंभारगणी गावास ही धोका निर्माण झाला आहे कधी गाव गायब होईल सांगता येत नाही सर्व ग्रामस्थ भीतीच्या छाया खाली आहे ग्रामस्थ भितीने घाबरूण जावून गाव सोडण्याच्या तयारीत तरी सुध्दा प्रशासनाची मदत किंवा कोणताही अधिकारी भेट देण्यास आले नाहीत असे ग्रामस्थ सांगतात .जर आणखी पाऊस झाला तर मंदिर हि वाहुन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कुंभारगाणीचे सरपंच संजय शेलाटकर व ग्रामस्थानी कुंभारगणी परिसरातील इतर गावाना सावधान राहण्याचा ईशारा दिला .

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.