१ जुलै ते ७ जुलै वन महोत्सव सप्ताह - वृक्षारोपण करून साजरा.

 १ जुलै ते ७ जुलै वन महोत्सव सप्ताह - वृक्षारोपण करून साजरा.

--------------------------------------

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर 

--------------------------------------

"प्राणी- पक्षी पर्यावरण संवर्धन हे भविष्यातील मानवी जीवनासाठी महत्त्वाचे ; "*वनरक्षक - गीता लोखंडे 




वाशिम ; वन महोत्सव सप्ताह निमित्त पर्यावरण प्रेमी प्राणी व सर्पमित्र प्रदिप पट्टेबहादूर यांच्या पुढाकारातून राजा प्रसेनजीत अल्पसंख्यांक शिक्षणा बहुउद्देशीय संस्था व नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ केकतउमरा त्यांच्या आयोजनातून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वन महोत्सव सप्ताह साजरा करण्यात आला, मागासवर्गीय तथा आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीगृह सिव्हिल लाईन वाशिम येथे वृक्षरोपण करून वन महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित प्रमुख मार्गदर्शक दिग्रस वन विभागातील वनरक्षक गीता लोखंडे, प्रमुख अतिथी अतुल राऊत, कार्यक्रमाच्या अध्यक्षा गृहपाल वर्षा लाकडे मॅडम,कार्यक्रमाचे आयोजक प्राणी व सर्पमित्र पर्यावरण प्रेमी प्रदिप पट्टेबहादूर होते. यावेळी वनरक्षक गीता लोखंडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, प्राण्याचे वन्यजीव आणि पर्यावरणाचे संवर्धन हे मानवी जीवनासाठी महत्त्वाचे आहे. नष्ट होत चाललेल्या जंगलांना पुनर्वसित करण्याचे आव्हान आपण आपल्यासमोर टाकले आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येने वृक्षारोपण केले पाहिजे.१ जुलै ते ७ जुलै हा सप्ताह वन महोत्सव म्हणून ओळखला जातो. हा सप्ताह इ.स. १९५० पासून भारतात साजरा केला जात आहे. मानवाला निसर्गाविषयी प्रेम व आदर निर्माण व्हावा असा याचा उद्देश आहे. पर्यावरणाला शुद्ध ठेवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने काही उपाय केले पाहिजेत. आज आपण पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करून वन महोत्सव साजरा केल्याबद्दल आपणा सर्वांना वन महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.


प्राणी व सर्पमित्र प्रदिप पट्टेबहादुर यांनी देखील नैसर्गिक पर्यावरणाचे व वन्य जीवाचे महत्व स्पष्ट करून प्रत्येकाने पाच वृक्ष लावावे असे आव्हान केले आहे. उपस्थित अध्यक्ष व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.


उपस्थित वनरक्षक कू.गीता लोखंडे, पर्यावरण प्रेमी प्राणी व सर्पमित्र प्रदिप पट्टेबहादूर,सामाजिक कार्यकर्ते अतुल राऊत,गृहपाल वर्षा लाकडे,कल्पना पोहरे, मॅडम, समीक्षा मोरे,पौर्णिमा इंगोले,संध्या शिंदे,पल्लवी घोडे, सुमन भगत, भारती इटकरे, लक्ष्मण काळे व वस्तीगृहातील विद्यार्थिनी मोठ्या उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा मोरे व आभार प्रदर्शन पौर्णिमा इंगोले यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.