दि न्यू इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी पोष्ट कार्यालयात केला आनंददायी शनिवार.
दि न्यू इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी पोष्ट कार्यालयात केला आनंददायी शनिवार.
----------------------------
चंदगड प्रतिनिधी
आशिष पाटील
----------------------------
चंदगड :- आजच्या मोबाईल आणि ईमेलच्या जमाण्यात पोस्टल सुविधांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून दि न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक एन.डी. देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोस्ट कार्यालयाला भेट दिली. पोस्टल सेवांबद्दल माहिती घेतली. महाराष्ट्र शासनाच्या आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत पोष्ट कार्यालयाला भेटीचे करण्यात आले.
कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. आंडगे
विद्यार्थ्यांना पोस्टल सेवा, पत्रव्यवहार, बचत पत्र आणि मनीऑर्डर यासारख्या सुविधांबद्दल माहिती दिली. विद्याथ्यांनी पोष्ट कार्यालयाच्या विविध विभागांना भेटी दिल्या. भेटीमूळे विद्यार्थ्यांना पोस्टल सेवा आणि त्यांचे महत्व समजून घेण्यात मदत झाली.
यावेळी मुख्याद्यापक
एन.डी. देवळे म्हणाले की, "विद्यार्थ्यांचा भावनिक, मानसिक, सामाजिक विकास, आनंददायी, बालस्नेही अध्ययन करण्यासाठी आनंददायी शनिवार या उपक्रमाचा उपयोग होतो. "
" विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम सुरु केला केला आहे. या माध्यमातून दर शनिवारी दैनंदिन अध्यापनामध्ये सजगता, कृती, अभिव्यक्ती या घटकांचा समावेश केला आहे. " असे मत उपक्रमशिल शिक्षक संजय साबळे यांनी मांडले.
यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ अध्यापक टी. एस. चांदेकर,एच. डी. तर्डेकर, एस. जी. यसादे उपस्थित होते. आभार एस. जी. साबळे यांनी मांडले.
Comments
Post a Comment