कर्नाटकाला जोडणार्या इचलकरंजी-शिरदवाड मुख्य रोडवर चर काढल्याप्रकरनी संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी- भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्य.
कर्नाटकाला जोडणार्या इचलकरंजी-शिरदवाड मुख्य रोडवर चर काढल्याप्रकरनी संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी- भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्य.
-----------------------------------
कोल्हापूर :प्रतिनिधी
-----------------------------------
सध्या पंचगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पुन्हा पुराचे पाणी सर्वत्र पसरत चालले आहे. कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या इचलकरंजी- शिरदवाड रोडवर शनिवारी दि. 28 जुलै 2024 रोजी दुपारचे सुमारास तीन ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने विना परवाना रस्ता खुदाई करण्यात आला. रस्त्यावर भली मोठी चर काढून पुराचे पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे सोडण्यात आले. परिणामी तोडकर मळा, मुजावर पट्टी, ढोले पानंद, बौद्ध विहार, रोहिदास नगर,राणाप्रताप चौक, गणेश मंडळ व इतर परिसर आदि भागात मोठ्या प्रमाणात रात्रीत पुराचे पाणी येऊ लागले. यामुळे भीतीपोटी सदर भागातील अनेक कुटुंबांना रात्रीत स्थलांतर करावे लागले. याप्रकरणी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने रस्ते खुदाई करून पाणी सोडण्यात येत असल्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना वरील भागातील नागरिकांना दिली नाही. यामुळे शेकडो कुटुंबांना याचा फटका बसला आहे. नदीवेस रोडच्या पश्चिमेकडील भागातील काही धनदांडग्या लोकांनी तसेच माजी नगरसेवकांच्या पुढाकाराने जेसीबीच्या साह्याने कर्नाटकला जोडणाऱ्या नदीवेस या मुख्य रोडवर तीन ठिकाणी भल्या मोठी चरी काढण्यात आल्या. रस्ता खोदणेबाबत कोणी परवानगी दिली याची माहिती मिळावी. परवानगी नसेल जेसीबी जप्त करण्यात यावा आणि कोणाच्या आदेशावरून रस्ता खोदला त्याचेवर फौजदारी गुन्हा तातडीने दाखल करण्यात यावा, अशी मागणी या अर्जाद्वारे करीत आहोत. सदर आर्जाचा विचार करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी यावी. अन्यथा भविष्यात कोणीही उठून अरेरावी करून रस्ता खोदण्याचा प्रकार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वरील तक्रार अर्जावर कोणती कारवाई केली त्यासंबंधीची माहिती आम्हास मिळावी. अर्जाची दखल न घेतल्यास आंदोलन उभारावे लागेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी.
Comments
Post a Comment