पुराबरोबर वाहून आलेल्या लाकडांचा बंधाऱ्यांना धोका

 पुराबरोबर वाहून आलेल्या लाकडांचा बंधाऱ्यांना धोका.

-------------------------------

मुरगूड प्रतिनिधी

जोतीराम कुंभार

-------------------------------

      पुराबरोबर वाहून आलेली लाकडे व इतर कचरा बंधाऱ्यास तटून रहातो व त्यामुळे मागे पाणी तुंबत जाते .या पाण्याचा दाब धरणावर पडून त्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

    याबाबतचे मत कांहीं जल अभियंत्यांनी सुध्दा व्यक्त केले आहे.

    कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधताना हे तंत्रज्ञान वापरलेले आहे. मुरगूडचे माजी नगराध्यक्ष विश्व नाथ राव पाटील यांच्या संकलपनेतून देशातील पहिला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा वेदगं गेवर कुरणी जवळ साकारला आहे. सुरुपली , बस्तवडे हे बंधारे सुध्दा या प्रकारे तयार झाले आहेत.

   पाणी निचरून जाण्याची सोय या बंधाऱ्यात आहे. 

    पुराच्या पाण्याबरोबर आलेल्या कचऱ्याने हे पाणी तुंबून रहाते व मूळ तंत्र धोक्यात येते.

     येथील समाजसेवक शिवभक्तांनी सुध्दा हीच बाबा निदर्शनास आणली आहे.

    धरण कृती समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी अशी या सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.