संजय घोडावत कॉमर्स अकॅडमीचे सीए फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश.
संजय घोडावत कॉमर्स अकॅडमीचे सीए फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश.
---------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे.
---------------------------
अतिग्रे: संजय घोडावत कॉमर्स अकॅडमीच्या 17 विद्यार्थ्यांनी सीए फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. 400 गुणांच्या या परीक्षेत युग मारू या विद्यार्थ्याने 359,ओम येडवडे 324 आणि श्रेया मोडासे 290 गुणांसहित उत्तीर्ण झाले.
चार्टर्ड अकाउंटन्सी अभ्यासक्रमातील सीए फाउंडेशन परीक्षा जून 2024 मध्ये घेण्यात आली या परीक्षेचा निकाल सोमवार 29 जुलै रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आला. देशभरातून प्रविष्ट झालेल्या एकूण 91,900 विद्यार्थ्यांपैकी 13,748 विद्यार्थी.(14.96%) उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संचालक वासू सर , सेंटर हेड गुप्ता सर, प्रिन्सिपल सौ.चैताली गुगरी व झोनल हेड प्रभू सर यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी,पालक, शिक्षक व कर्मचारी यांचे अभिनंदन करून यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment