तावडे हॉटेल उड्डाण पुल व उचगांव उड्डाण पुल येथे सतत होणारी वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी सिग्नल यंत्रणा पुन्हा सुरू करावी - करवीर तालुका शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे).

 तावडे हॉटेल उड्डाण पुल व उचगांव उड्डाण पुल येथे सतत होणारी वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी सिग्नल यंत्रणा पुन्हा सुरू करावी - करवीर तालुका शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे).

----------------------––----–--------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

----------------------––----–--------

तावडे हॉटेल उड्डाण पुल व उचगाव उड्डाण पुल येथे वाहतुकीची कोंडी होत असल्याने पोलिसांच्या सुचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्था व आमदार फंडातून सिग्रल यंत्रणा काही वर्षापुर्वी बसविण्यात आली, त्यानंतर ही यंत्रणा का बंद ठेवण्यात आली, याचे कारण कोणते हे समजण्यास मार्ग नाही. ही सिग्रल यंत्रणा बंद स्वरूपात असल्याने हया दोन्ही उड्डाण पुलाखाली वाहतुकीच्याकोंडीचा प्रश्न जटील झाला आहे.*


*पश्चिम महाराष्ट्रातील गांधीनगर बाजारपेठ व तीन औद्योगिक वसाहतीसाठी वरदान ठरलेले ते पुल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. सिग्रल यंत्रणा बंद झाल्यापासून येथे वाहतूक कोंडीची समस्या डोके दुखी बनली आहे. विद्यार्थी, ग्राहकवर्ग, नागरिक व वाहन धारकांना याचा नेहमी त्रास सहन करावा लागतो. प्रसिद्ध हुपरी चांदी बाजार पेठेसाठी व पुणे, मुंबई सह कर्नाटकात जाण्यासाठी हे पुल अत्यंत महत्वाचे ठरले आहेत. महाराष्ट्रातील हुपरीची प्रसिध्द चांदी बाजारपेठ असो अथवा गांधीनगर पश्चिम महाराष्ट्रात प्रसिध्द बाजारपेठ असो येथे नेहमी गर्दी असते. त्यामुळे सिग्रल यंत्रणा बंद ठेवणे उचित आहे का? असे असताना येथील यंत्रणा बंद ठेवणे है गैर व बेजबाबदारपणाचे आहे. ही सिग्नल यंत्रणा पुर्ववत सुरू करा. अन्यथा आठ दिवसात ही यंत्रणा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.*

   *या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने मा. आबसाहेब शिरगिरे, ए.पी.आय , गांधीनगर पोलिस ठाणे व  मा. मनोज खोत, ए.पी.आय यांना देण्यात आले.*

 *यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की या दोन्ही उड्डाणपुलाखालील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करू व सिग्नल यंत्रणा पूर्ववत चालू करू.*

  *यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, विभाग प्रमुख दीपक फ्रेमवाला, विभाग प्रमुख वीरेंद्र भोपळे, गांधीनगर शहर प्रमुख दिलीप सावंत, उपशहर प्रमुख दीपक अंकल, शरद माळी, फेरीवाला संघटनेचे कैलास जाधव, बाबुराव पाटील, किशोर कामरा, सुनील पारपाणी, मनोहर आहुजा, दीपक धिंग, धर्मेंद्र मेघवानी, महेश सचदेव, वसंत पोवार, नमेश चव्हाण आदी उपस्थित होते.*

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.