राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस.
राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस.
-------------------------------राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------------
राधानगरी धरणाचे स्वयंचलित पाच गेट एका तासातच उघडलं. तर यापूर्वी दोन दरवाजे ओपन होते असे
एकूण सात गेट ओपन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस लागत असल्याने राधानगरी धरणाचे आज पहाटे 4:50 वाजल्यापासून पाच 55 पर्यंत पाच संचलित दरवाजे उघडले आहेत ते खालील प्रमाणे
आज बुधवारी पहाटे 4:50 वाजता गेट क्रमांक पाच उघडला
पहाटे चार वाजून 53 मिनिटांनी गेट क्रमांक तीन उघडला
पहाटे पाच वाजून 16 मिनिटांनी गेट क्रमांक चार उघडला
पहाटे पाच वाजून 33 मिनिटांनी गेट क्रमांक एक ओपन झाला
पहाटे पाच वाजून 55 मिनिटांनी गेट क्रमांक दोन ओपन झाला असे एकूण पाच स्वयंचलित दरवाजे एक तास पाच मिनिटात ओपन झाले आहेत असून यापूर्वीचे दोन संचलित दरवाजे ओपन झाले होते असे एकूण सात स्वयंचलित दरवाजे ओपन झाले आहेत तसेच धरण परिसरात 172 मिलिमीटर पाऊस झाला असून पडळी व पिरळ या पुलावर पाणी आल्याने त्या मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे
नदीकाठच्या लोकांनी पावसाचा जोर वाढत असल्याने नदीपात्रामध्ये पाण्यामध्ये वाढ होत असल्याने सावधगिरी बाळगावी असे आव्हान भोगावती पाटबंधारे खात्याकडून करण्यात येत आहे
Comments
Post a Comment