Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षण आरोग्याचा दर्जा वाढविण्यासाठी सांगलीचा जयंत पॅटर्न राज्यात राबवणार.. अजित पवार यांची विधानसभेत घोषणा.

 शिक्षण आरोग्याचा दर्जा वाढविण्यासाठी सांगलीचा जयंत पॅटर्न राज्यात राबवणार.. अजित पवार यांची विधानसभेत घोषणा.

------------------------------------------

मिरज कुपवाड प्रतिनिधी 

राजू कदम

------------------------------------------

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे काल अधिवेशनाचा नवा दिवस होता, मुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी सांगली जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषद शाळांबाबत राबवण्यात आलेल्या उपक्रमाचेही चर्चा झाली. हा उपक्रम आपण राज्यात सगळीकडे राबवणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री पदी असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा परिषद शाळांचा व आरोग्य व्यवस्थेचा दर्जा वाढावा यासाठी सांगली जिल्ह्यात , माझी शाळा आदर्श शाळा व स्मार्ट पीएचसी, हे उपक्रम राबविले. 

हे उपक्रम यशस्वी ठरले असल्याने संपूर्ण राज्यात हे उपक्रम राबवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल विधानसभेत केले..

Post a Comment

0 Comments