Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राऊतवाडी धबधब्या येथे तोतया पोलीस कर्मचारी पंकज युवराज पाटील यास अटक राधानगरी पोलिसांची कारवाई.

 राऊतवाडी धबधब्या येथे तोतया पोलीस कर्मचारी पंकज युवराज पाटील यास अटक राधानगरी पोलिसांची कारवाई.

-------------------------------

 राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे 

-------------------------------

राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा येथे कुर्डू करवीर येथील पंकज युवराज पाटील हा तोतागिरी करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी पंकज पाटील यांच्या गुन्हा दाखल अटक केले असल्याची माहिती राधानगरी पोलीस दिली


या बाबत अधिक माहिती अशी की राऊतवाडी धबधबा येथे राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस दत्तात्रय जयसिंग शिंदे हे  बंदोबस्त साठी असताना कुर्डू तालुका करवीर येथील पंकज युवराज पाटील वर्षे छत्तीस हे रविवारी सायंकाळी पाच वाजता  राऊतवाडी धबधबा पाहण्यासाठी आले होते त्यावेळी ड्युटीवर असणारे दत्तात्रय शिंदे पोलीस त्यांना मी पोलीस लोकसेवक आहे अशी बतावणी करून तोतगिरि करून कायदेशीर कामात अडथळा आणून अर्वाच्य शिवीगाळ व धमकी देऊन शिंदे पोलीस यांच्यावर गैरवर्तन केल्याबद्दल दत्तात्रय शिंदे पोलीस यांनी राधानगरी पोलीस स्टेशन फिर्याद दिल्यावर पंकज पाटील याला बी एन एस कायदा कलम 115 132 204 352 351 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केले आहे

 अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घेरडेकर पोलीस कॉन्स्टेबल शेळके हे करत आहेत

Post a Comment

0 Comments