अडीच वर्षाच्या लेकीला कडेवर घेऊन कोमल बाभणीकर यांचा पन्हाळा ते पावनखिंड प्रवास.

 अडीच वर्षाच्या लेकीला कडेवर घेऊन कोमल बाभणीकर यांचा पन्हाळा ते पावनखिंड प्रवास.

-----------------------------------------

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत सिंह ठाकुर .

-------------------------------------------

   रिसोड येथील कोमल बाभणीकर यांनी पन्हाळा ते पावनखिंड हा 52 किमी चा आपल्या लेकीला कडेवर घेऊन पायी प्रवास केल्याने कोमल बाभणीकर यांचे कौतुक होत आहे.

     रिसोड येथील रायबा आणि कोल्हापूर येथील स्वराज्याचे शिलेदार यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा ते पावनखिंड या मोहिमेचे आयोजन दि. 12,13 व 14 जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते.यामध्ये रिसोड येथील कोमल बाभणीकर यांनी आपल्या चिमुकलीसह सहभाग घेऊन दिनांक 12 रोजी 20 किमी तर दि. 13 रोजी 32 किमीचा पायी प्रवास करून ही मोहीम पूर्ण केली. वाटेने चालत असताना अरुंद पायवाट,सतत पडणारा पाऊस,डोंगर,दरी, घनदाट जंगल,ओढे यांना पार करत आपल्या लेकीला कडेवर घेऊन जय जिजाऊ जय शिवराय या घोषणेसह  l52 किमीची ही बिकट आणि खडतर वाट पूर्ण करत ही मोहीम पूर्ण केली.

     यावेळी बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतिस्थळी कोमल यांचा रायबा ग्रुपचे सर्वेसर्वा विकासजी इरतकर आणि स्वराज्याचे शिलेदारचे रामदासजी पाटील यांनी 'आधुनिक हिरकणी'म्हणून कोमल बाभणीकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.. याबाबत 'आधुनिक हिरकणी' म्हणून कोमल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे..

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.