Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मंत्री मेटलिक्स कंपनी विरोधात कामावर रुजू करून घेण्यासाठी कामगारांचे आमरण उपोष.

 मंत्री मेटलिक्स कंपनी विरोधात कामावर रुजू करून घेण्यासाठी कामगारांचे आमरण उपोष.

-----------------------------------------

फ्रंटलाईन  न्युज महाराष्ट्र 

शिरोली प्रतिनिधी

अमित खांडेकर 

-----------------------------------------

शिरोली एमआयडीसी मध्ये मंत्री मेटलिक्सही एक नामांकित कमी आहे या कंपनीमध्ये प्रकाश आनंदा कदम, युवराज शिवाजी चौगुले, शिवरुद्र मल्लाप्पा हिरेमठ, गुरुदेव बाबुराव तोडकर, माणिक बाळासो लोहार, विकी दिलीप पाटील हे कामगार गेली 12 ते 17 वर्ष या कंपनीमध्ये कायमस्वरूपी कामगार म्हणून काम करत होते. पण कंपनी प्रशासनाने चुकीचे आरोप करून या कामगारांना कामावरून काढून टाकले  आहे.या  एकतर्फी कारवाई विरोधात मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 पासून या सहा जणांनी मंत्री मेटलिक्स कंपनीच्या गेट समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.कंपनी प्रशासनाने आमच्यावर अन्याय करून कामावरून काढून टाकलेआहे. त्यामुळे आम्ही बेरोजगार झालो आहोत. तसेच आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी कंपनीने आम्हास कामावर रुजू करून घ्यावे या मागणीसाठी आम्ही हे उपोषण सुरू केल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे. आम्हा उपोषणकर्त्याचे काही बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी कंपनी व्यवस्थापन ,चेअरमन, शासन हे जबाबदार राहील तरी आम्हाला त्वरित न्याय मिळावा अशी मागणी यांनी या व्यक्त केली आहे.

     या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत,कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे,जिल्हाधिकारी कोल्हापूर, कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य,तसेच यासंबंधीत सर्व विभागांना आमच्या मागण्याचे निवेदन दिले आहे. उपोषण स्थळी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी भेट देऊन कामगारांशी चर्चा केली. त्यांनी आपण स्वतः कंपनीचे मालक, प्रशासन, कामगार आयुक्त यांच्याशी चर्चा घडवून आणून मार्ग काढू अशी ग्वाही दिली. पण कामगार उपोषणावर ठाम राहिले. आम्हाला कामावर रुजू करून घेतल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही अशी भूमिका घेतली.

Post a Comment

0 Comments