Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बिद्रीच्या सभासदांचा राधानगरी तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा कारवाईचा केला निषेध.

 बिद्रीच्या सभासदांचा राधानगरी तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा कारवाईचा केला निषेध.

-----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

-----------------------------------------

बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल  प्रकल्पावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल कारखान्याच्या सभासदांनी राधानगरी तहसील कार्यालयावर  निषेध मोर्चा काढला.यावेळी  आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यांचा निषेध व्यक्त  करण्यात आला.  मागणीचे निवेदन तहसीलदार अनिता देशमुख यांना देण्यात आले.

बिद्री साखर कारखान्यावर आमदार प्रकाश आबिटकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकाऱ्यांनी कारखान्याचा  इथेनॉल प्रकल्प शील केला आहे. याच्या निषेधार्थ बिद्री साखर कारखान्याच्या सभासदांनी  राधानगरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाची सुरुवात अंबाबाई मंदिरापासून झाली. देवगड निपाणी राज्य मार्गावरून प्रचंड घोषणाबाजी करत मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आला. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर आणि कार्यकर्त्यांचा निषेध केला. तर चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कारखान्यावर झालेली कारवाई योग्य असल्याचे जाहीर केले. याच्या निषेधार्थ त्यांच्या पुतळ्याला जोडे मार आंदोलन केले.तर सर्वच उपस्थित यांनी  तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. 

   राज्य उत्पादन शुल्क विभागा ने केलेल्या या कारवाईमुळे पुढील हंगाम सुरू होणार नाही. त्यामुळे शेतकरी कामगार उध्वस्त होणार आहेत. यासाठी पुढील काळात सर्वांनी संघटित होउन लढा देणे गरजेचे आहे. कारखान्याच्या कारवाईबाबत आम्ही हायकोर्टात गेलो असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार अनिता देशमुख यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात 50 खोके एकदम ओके, शेतकऱ्यांच्या 135 कोटीच्या इथेनॉल प्रकल्पाला ठोकले टाळी अशी बोर्ड लक्षवेधी ठरले. मोर्च्यात गोकुळ संघांचे व बिद्री साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र कृष्णाजी मोरे, गोकुळ संघांचे संचालक किसन चौगुले,बिद्रीचे संचालक राजेंद्र भाटळे, धैर्यशील पाटील, बाळासाहेब कळमकर, जालिंदर पाटील अजित पोवार, जे बी जाधव, सुरेश चौगुले, संभाजी भोईटे, शरद पाडळकर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ऊस उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments