एक कोटीच्या अपहार प्रकरणी सांगली जिल्हा बँकेच्या नऊ कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

 एक कोटीच्या अपहार प्रकरणी सांगली जिल्हा बँकेच्या नऊ  कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

---------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी  

 राजू कदम

---------------------------------------

सांगली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव तालुक्यातील तासगाव मार्केट यार्ड तासगाव हातनूर सिद्धेवाडी आणि निमानी या पाच शाखेत तब्बल एक कोटी 62 लाख 67 हजार 835 रुपयाचा अपहार झाल्याबाबत जिल्हा बँकेच्या वतीने संबंधित नवकर्मचारावर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. 

जिल्हा बँकेच्या निमणी शाखेत व्याज आणि शासकीय अनुदान खात्यातील आठ लाख 32 हजार 900 रुपये शाखेतील प्रमोद सुरेश कुंभार

(रा सांगलवाडी)  आणि शाखा अधिकारी विजय तुकाराम यादव (रा पलूस)  या दोघांनी संगनमताने  अपहार केला आहे प्रमोद कुंभार यांनी वैयक्तिक आठ लाख 12 हजार 400 रुपयांचा आणि शाखा अधिकारी यादव यांच्या संगनमताने वीस हजार पाचशे रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी हबीब जहिरउद्दीन कुलकर्णी यांनी फिर्याद दिले आहे सिद्धेवाडी शाखेत अविनाश दिलीप पाटील  (रा .अंजनी ) विनायक शंकर सूर्यवंशी (रा नागेवाडी) सुरेश वसंतराव कोळी (रा मांजर्डे) या तीन कर्मचाऱ्यांनी चाळीस लाख 86 हजार 5 68 रुपयाची रक्कम शाखेतील सहा खातेदारकाच्या खात्यावर परस्पर संमती विना वर्ग करून अपहर केला आहे याप्रकरणी विक्रांत विजयकुमार लाड यांनी फिर्याद दाखल केली आहे बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखा आणि हातनूर शाखेतील कर्मचारी संजय कुमार पाटील राहणार (शिरगाव) यांनी शासकीय अनुदानाची रक्कम सहा खातेदाराच्या वैयक्तिक खात्यावर परस्पर वर्ग करून 64 लाख 58 हजार 68 रुपयाचा अपहार केला आहे याप्रकरणी विक्रांत विजयकुमार लाड यांनी प्रिया दाखल केली आहे तासगाव शाखेत प्रमोद सुरेश कुंभार (रा सांगलवाडी) योगेश सुरेश वंजरीणकर रा (तासगाव). मारुती यशवंत हिल्ले  (रा. नांद्रे) त्या कर्मचाऱ्यांनी संगणमत्ताने अवकाळी अनुदान दुष्काळी निधी संजय गांधी निराधार पेन्शन खाते असे टप्प्याटप्प्याने एकूण 48 लाख 90 हजार 299 रुपयाचा आभार केला आहे याप्रकरणी झेरुद्दीन कुलकर्णी यांनी तासगाव पोलिसात दाखल केली आहे. 

नेलकरंजी शाखेतील तीन कर्मचाऱ्यांवरील गुन्हा दाखल आटपाडी तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नेलकरंजी शाखेत 48 लाख 88 हजार 3 अष्टोत्तर रुपयाचा अपहर केल्याप्रकरणी लोकपाला सहतीन कर्मचाऱ्यांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मच्छिंद्र गुंडा मरगुडे ( रा तळेवाडी) प्रदीप गुलाबराव पवार (करगणी) आणि दिगंबर पोपट शिंदे ( नेलकरंजी) आशिया कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 

याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तालुका विभागीय अधिकारी हरून रज्जाक जमादार यांनी फिर्याद दिली आहे.....

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.