Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिरोली येथे नवीन फौजदारी कायद्याविषयी जनजागृती, सपोनि पंकज गिरी यांची उपस्थिती.

 शिरोली येथे नवीन फौजदारी कायद्याविषयी जनजागृती, सपोनि पंकज गिरी यांची उपस्थिती.

----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

शिरोली प्रतिनिधी

अमित खांडेकर 

----------------------------------------

 जेव्हा नागरिक कायद्यांचे पालन करतात तेव्हाच शांतता आणि सुव्यवस्था राखली जाऊ शकते. त्यामुळे नवीन फौजदारी कायद्यांबद्दल नागरिकांना जागरूक करण्याची नितांत गरज आहे. असे मत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी व्यक्त केले.

नवीन फौजदारी कायदा व त्याचे स्वरूप याबद्दलची माहिती देण्यासाठी येथील शिरोली हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. पद्मजा करपे होत्या.

सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी म्हणाले,

आपल्या नागरिकांमध्ये कायदेविषयक ज्ञान फार कमी आहे. समाजातील सर्वच घटकांनी देशाच्या कायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून ते त्यांचे सार्वजनिक वर्तन  सुधारू शकतील. ऑनलाइन किंवा ईमेलद्वारे तक्रारी नोंदवण्यासारख्या न्याय मिळवण्यासाठी प्रगत साधने आणि यंत्रणा आणल्या जातात. त्याबद्दलही आपण जागरूकता ज्ञान देण्याचे कआम केले पाहिजे.

यावेळी मुख्याध्यापक एम. एस. स्वामी, सरपंच पद्मजा करपे, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती तावडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी निलेश कांबळे, ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव, कमल कौदाडे, हर्षदा यादव, सुजाता पाटील, वसिफा पटेल, नजीया देसाई, योगेश खवरे, बाळासाहेब पाटील,सचिन कोळी, मोहसिन देसाई, निवास पाटील आदी उपस्थित होते. 

स्वागत पर्यवेक्षिका एस. एस. गाडेकर यांनी केले. सूत्रसंचलन एन. वाय. पद्माई यांनी केले. आभार आर. एम. मारापुरे यांनी मानले. यानंतर शिरोली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गावातून जनजागृती फेरी काढून फौजदारी कायद्याची माहिती दिली.

Post a Comment

0 Comments