नागाव येथे शेतामध्ये औषध फवारणी करताना विजेची तार आंगावर पडून एकाचा मृत्यू .

 नागाव येथे शेतामध्ये औषध फवारणी करताना विजेची तार आंगावर पडून एकाचा मृत्यू .

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

शिरोली प्रतिनिधी

अमित खांडेकर 

---------------------------------

नागाव तालुका हातकणंगले येथील चेअरमन पाणंद परिसरातील शेतामध्ये उसावर औषध फवारणी करत असताना शेतावरून गेलेली  तार अंगावर  पडल्याने युवकाचा जागीच  मृत्यू झाला. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सुनील बापू शिंदे वय वर्ष 43 हे नागाव चे रहिवाशी होते. ते कोल्हापूर येथील रहिवाशी असलेले श्री काटे यांच्या नागाव येथील शेतामध्ये वाटेकरी म्हणून काम करतात. आज सकाळी दहाच्या सुमारास ते शेतामध्ये ऊस पिकावर औषध फवारणी करत असताना अचानक पणे शेताच्या वरून गेलेली तार अंगावर पडलेने विजेचा जोरदार धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच नागावचे पोलीस पाटील बाबासो पाटील यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्दी दिली. त्यानंतर तातडीने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून सी पी आर येथे पाठवण्यात आला. ही घटना महावितरणचे किरण तरडे हे अधिकारी कर्मचाऱ्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांनी महावितरणच्या कामकाजाविषयी रोष व्यक्त केला. घटना घडल्यानंतर शेतकऱ्यांनी,नागरिकांनी मोठी गर्दी  घटनास्थळी केली होती. या अशा आकस्मिक घटनेमुळे नागावसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची फिर्याद श्री शरद पाटील यांनी दिली असून पुढील तपास चालू आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.