दूधसाखर महाविद्यालयात यावर्षीपासून एम.एस्सी ॲनॅलेटिकल केमिस्ट्री विषयास मान्यता.
दूधसाखर महाविद्यालयात यावर्षीपासून एम.एस्सी ॲनॅलेटिकल केमिस्ट्री विषयास मान्यता.
------------------------------------
विजय कांबळे
बिद्री प्रतिनिधी
------------------------------------
*बिद्री येथील दूधसाखर शिक्षण प्रसारक मंडळाच्या दूधसाखर महाविद्यालयास चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासुन एम.एस्सी ॲनॅलेटिकल केमिस्ट्री या विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास शिवाजी विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाची मान्यता मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी दिली.*
गेली ३५ वर्षे शिवाजी विद्यापीठ संलग्नित दूधसाखर महाविद्यालय कला व विज्ञान शाखा मधून गुणवत्ता पूर्ण पदवी शिक्षण देत असुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महाविद्यालयात नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चार तालुक्यातील सभासद व विद्यार्थी वर्गातून केमिस्ट्री या विषयाची पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सातत्याने मागणी होती संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार के. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देता येईल असा एम.स्सी केमिस्ट्री चा हा अभ्यासक्रम सुरू करणेसाठीचा परवानगीचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला होता.त्यास शासनाची परवानगी मिळाल्याने परीसरातील पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याच महाविद्यालयातील तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन व उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे.शिवाय बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा पैसा व वेळ वाचणार आहे. या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या कामी संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार के. पी. पाटील उपाध्यक्ष मा. गणपतराव फराकटे सचिव सर्जेराव किल्लेदार सर्व संचालक मंडळ यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment