अंबप येथे मुसळधार पावसाने घर कोसळले.
अंबप येथे मुसळधार पावसाने घर कोसळले.
----------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
-----------------------------------
अंबप ता हातकणंगले येथे राजेंद्र कांबळे यांचे घर पावसाने कोसळले. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या कुटुंबाचे सुमारे तीन लाख रुपयांचे रुपयांचे नुकसान झाले.
अंबप येथील माळकरी गल्लीमध्ये राजेंद्र सखाराम कांबळे यांच्या घरी त्यांची भाची अर्चना कांबळे व त्यांचे कुटबीय राहत होते. वीट बांधकाम केलेलं सुमारे २५ वर्षांपूर्वीचे घर होतं पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या संतधार पावसामुळे बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास कांबळे यांचे घर अचानक कोसळले. सकाळची वेळ असल्याने सर्व कुटुंबीय घरातच होते. अचानक घराचा आवाज होऊ लागल्याने सर्वजण बाहेर आले. यानंतर काही क्षणातच घर कोसळले. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे कुटुंबीय भयभीत झाले होते. यामुळे कांबळे कुठूंब बेघर झाले आहे.
तसेच सरकारी दवाखान्याजवळ शिवाजी माळी यांच्या घराची भिंतीची पडझड झाली आहे.
......
फोटो
अंबप : येथे अर्चना कांबळे यांचे कोसळलेले घर
Comments
Post a Comment