13 ऑगस्टपासून तीन दिवस प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा.
------------------------------------
लोहा प्रतिनीधी
अंबादास पवार
------------------------------------
घरोघरी तिरंगा ध्वज फडकविण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन.
नांदेड दि. 12 : भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जनतेच्या मनात तेवत राहाव्यात आणि देशभक्तीची जाज्ज्वल भावना कायमस्वरुपी त्यांच्या मनात राहावी, यासाठी 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत 'हर घर तिरंगा' अर्थात घरोघरी अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, खासगी आस्थापना आणि प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण करण्यासाठी 9 ऑगस्टपासून आयोजित उपक्रमांना नागरिक, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. हर घर तिरंगा अभियानात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरांवर #तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात सर्वांनी उत्साहपूर्ण वातावरणात सहभागी व्हावे. तसेच यंदा घरावर ध्वज फडकविण्याचा मान कुटुंबातील महिला सदस्यांना देवून आगळावेगळा आदर्श निर्माण घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने पुढाकार घ्यावा. राष्ट्रीय वेशभूषा करून सर्वांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी ध्वज फडकावून या उपक्रमात सहभागी व्हावे. तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याने ध्वजासोबत सेल्फी घेवून www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0 Comments