धाबे हॉटेल दुकाने वेळेपेक्षा जास्त वेळ चालू ठेवणाऱ्या 15 जनावर लोहा पोलिसात गुन्हे दाखल.
---------------------------------
लोहा प्रतिनिधि
अंबादास पवार
---------------------------------
कोणतीही आस्थापना दुकाने हॉटेल धाबे पान टपरी ही ठरवून दिलेल्या वेळेच्या नंतरही सुरू ठेवण्यात येऊ नये असा आदेश पोलीस महानिरीक्षक उमाप साहेब यांनी दिला होता.
यात काल दि. 30/8/24 रोजी रात्री साडेदहा वाजल्यानंतर लोहा शहरामध्ये हायवे ला लागून हॉटेल धाबे काही पान टपरी व काही दुकाने ही सर्रासपणे चालू असल्याचे दिसल्यावरून लोहा पोलीस स्टेशनच्या विविध पथकांनी सदर आस्थापनाधारकांवर ठरवून दिलेल्या वेळेपेक्षाही जास्त वेळ आपली आस्थापना चालू ठेवणे या अपराधासाठी गुन्हे दाखल केले आहेत.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 33 (w) प्रमाणे 15 आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले असून.
15 ही आरोपी विरुद्ध खटला न्यायालयामध्ये पाठविण्यात आला आहे.
तसेच रात्री उशिराने संशयास पदरी त्या कुठलेही काम नसताना शहरांमध्ये विनाकारण फिरणाऱ्या दोन आरोपींना चोरीच्या संशयावरून अटक करून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 122 प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यावेळी पोलिसांनी माहिती दिली की ठरवून दिलेल्या वेळेपेक्षाही जर कोणी आपले आस्थापना चालू ठेवत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील.
0 Comments