Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सर्व्हर डाऊन जुलैतील 30 टक्के रेशन पडून लक्षावधी लाभार्थी वंचित.

  सर्व्हर डाऊन जुलैतील 30 टक्के रेशन पडून लक्षावधी लाभार्थी वंचित.

-------------------------------------

मेढा  प्रतिनिधी 

 शेखर जाधव

-------------------------------------

रेशनिंगदार दुकानदारांनी ई-पॉस मशीन नेटवर्क सरोवर प्रोबलेम विषयी काढला तहसील कार्यालयावर मोर्चा व इ पॉस मशीन केल्या जमा.


ई-पॉस मशीनचे सव्र्व्हर डाऊन असणे, नेट न मिळणे, रेशन वाटपातील अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी रेशन दुकानदारांनी  बुधवार  (७ ऑगस्ट) तहसीलदार  कार्यालयासमोर आंदोलन केले. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या जावली तालुका अध्यक्ष श्री राजेंद्र भिलारे ,उपाध्यक्ष संजय पवार ,किशोर शहा, प्रदिप आढाव , माजी.अध्यक्ष शशिकांतजी शेलार, सुजित धनावडे व सर्व रेशन दुकानदार यांच्यानेतृत्वात  पार पडले. दुपारी बारा ते दीड वाजेच्या सुमारास ई-पॉस प्रणालीच्या निषेधार्थ  ९५ बंद ई पॉस मशीन जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदारांना सुपूर्द केल्या. मात्र समस्या तातडीने न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला. केंद्र सरकारने रेशन अन्नधान्य वाटपातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ई-पॉस मशीनद्वारे ऑनलाईन वाटपाची पद्धत आणली. परंतु,


मशीनच चालत नसल्याने ही प्रक्रिया ठप्प पडली आहे

आंदोलनानंतर बंद मशीन तहसीलदारांना केल्या सुपूर्द


 ९५ रेशन दुकान जावली तालुक्यात आहेत.

लाखोलाभार्थि जिल्ह्यामध्ये आहेत.

रेशन दुकानदारांच्या प्रमुख मागण्या


इंटरनेट सेवा गतिमान करावी, सव्र्व्हर प्रश्न सोडवावा,


५०० रुपये प्रतिक्विंटल कमिशन मिळावे, मशीन अनेकदा अंगठ्याचा ठसा घेत नाही, समस्या सुटेपर्यंत रेशन वाटप करता येणार नाही, दुकानदारांना केवायसीची परवानगी द्यावी, ऑफलाइन वाटप करण्याची परवानगी मिळावी, आदी

अद्याप ई-पॉसची समस्या सुटली नाही

Post a Comment

0 Comments