धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने काळामवाडी धरणातून 9800 क्यूशेक पाण्याचा विसर्ग सुरू.
----------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------
दूधगंगा नगर तालुका राधानगरी येथील राजर्षी शाहू सागर धरण परिसरात पावसाची जोरसुरू असून धरणाच्या परिचलण सूचनेनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवारी सकाळी सात वाजता धरणाच्या वक्राद्वारा सांधव्यावरून 8300 क्यूशेक तर जलविद्युत केंद्रातून 1500 क्यूशेक असे एकूण दूधगंगा नदी पात्रात 9800 क्यूशेक पाण्याचा विसर्ग धरणाच्या वक्राद्वारे सुरू करण्यात आला होता परंतु पावसाचा जोर वाढत असल्याने धरणातून ज्यादा सातशे क्यूशेक पाणी वाढवण्यात आला असा एकूण 9800 क्यूशेक तर विद्युत ग्रहातून पंधराशे असा 9800 क्यूशेक पाण्याचा विसर्गसोडण्यात येत असून तो दूधगंगा नदीपात्रात वाढ होत आहे
आज धरण परिसरात 33 मिलिमीटर इतका पाऊस झाला असून आज अखेर 2954 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे परिणामतः धरणाच्या जलाशयाची पातळी ६४३. ४१ फुट असून धरणाचा पाणीसाठा 633.041द.ल.घ.मी. इतका आहे. आज स्थितीला धरणात 22.35 टी एम सी म्हणजेच 83.03% टक्के धरण , भरले असून पावसाळा जोर जसा जसा वाढेल तसा विसर्ग वाढण्यात येणार असल्याचा इशारा दूधगंगा पाटबंधारे खात्याकडून देण्यात आला आहे
तरी , दूधगंगा नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी असे आव्हान दूधगंगा (काळमवाडी) धरणाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे
0 Comments