इचलकरंजी-शिरदवाड रोडवर चर काढल्याप्रकरनी चौकशी करावी - भ्रष्टाचार जन आंदोलन जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत देशमुख.
इचलकरंजी-शिरदवाड रोडवर चर काढल्याप्रकरनी चौकशी करावी - भ्रष्टाचार जन आंदोलन जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत देशमुख.
---------------------------------
कोल्हापूर: प्रतिनिधी
---------------------------------
चर विनापरवानगी काढल्या मुळे संबधितावर फौजदारी दाखल करा.
पूरामुळे नागरिकांची गैरसोय झाली याला जबाबदार कोण?
कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या इचलकरंजी- शिरदवाड रोडवर शनिवार दि. २८ जुलै रोजी दुपारी तीन ठिकाणी जेसीबीने रस्ता विनापरवाना खुदाई केला. यामुळे पुराचे पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे सोडण्यात आले. यामुळे तोडकर मळा, मुजावर पट्टी, ढोले पानंद, बौद्ध विहार, रोहिदास नगर,राणाप्रताप चौक, गणेश मंडळासह आदी भागात पुराचे पाणी वाढू लागले. यामुळे सदर भागातील कुटुंबांना रात्रीत स्थलांतर करावे लागले. याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन विभागाने रस्ते खुदाई करून पाणी सोडण्यात येणार म्हणून कोणालाही पूर्वकल्पना दिली नाही. यामुळे येथील कुटुंबांना याचा फटका बसला. नदीवेस रोडच्या पश्चिमेकडील काही धनदांडग्या व माजी नगरसेवकांच्या पुढाकाराने कर्नाटकला जोडणाऱ्या नदीवेस या मुख्य रोडवर तीन ठिकाणी खोदला. रस्ता खोदणेबाबत कोणी परवानगी दिली? याची माहिती मिळावी. तसेच परवानगी नसेल तर जेसीबी जप्त करावा.तसेच कोणाच्या आदेशावरून रस्ता खोदला! त्याचेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्य जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत देशमुख यांनी शिष्टमंडळासह ( इचलकरंजी आयुक्त व प्रांत ) यांना देण्यात आले. याबाबत तात्काळ कारवाई करावी यावी. अन्यथा भविष्यात कोणीही उठून रस्ते खोदून मनमानी करेल.
सदर तक्रार अर्जावर कोणती कारवाई केली याची माहिती मिळावी.तसेच अर्जाची दखल न घेतल्यास आंदोलन केले जाईल. याला प्रशासन जबाबदार असेल.असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी
रावसाहेब कांबळे,राजेश मस्कर,रोहन होगाडे,बाबु नेजे,भारत चौगुले,प्रशांत माने,अमित कांबळे,आक्षय कांबळे,रोहित चंदनशिवे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment