“वाणिज्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध – सी. ए. कविता साठे”
---------------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
---------------------------------------
वाई दि २६, वाजिण्य शाखेतील पदवीधरांना आजच्या जगात करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा. तसेच यासाठी विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करून आपले करिअर यशस्वी करावे. असे मत सी.ए. कविता साठे यांनी व्यक्त केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने “वाणिज्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी” या विषयावर त्या बोलत होत्या. याप्रसंगी श्री. चंदन देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, तीन्ही शाखांचे उपप्राचार्य श्री. भीमराव पटकुरे, प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, डॉ. हणमंतराव कणसे उपस्थित होते.
श्रीमती साठे पुढे म्हणाल्या की, कोणत्याही व्यक्तीला यशस्वी करिअर घडविण्यासाठी कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास याला पर्याय नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा अत्यंत कौशल्यपूर्वक आणि व्यवहार चार्तुयाने उपयोग करून मिळालेल्या संधीचे विद्यार्थ्यांनी सोनं केले पाहिजे. याप्रसंगी श्री. चंदन देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी “यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही, त्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जावून मार्ग काढला पाहिजे तरच यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली तुम्हाला मिळेल असा शुभसंदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री. जयवंत पवार यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय दिपाली चव्हाण तर सूत्रसंचालन श्रुती यादव यांनी केले. आभार श्री. संदीप पातूगडे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments